MGID Header Code
Code End

महिलांच्या योगदानाची जाणीव हाच त्यांच्या सन्मानाचा पाया – राजेंद्र पवार

 


महावितरणच्या ‘सन्मान सौदामिनींचा’ सोहळ्यात नवदुर्गांचा गौरव

पुणे : महिलांना विविध आघाड्यांवर अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यांच्या या प्रयत्नांची आणि योगदानाची जाणीव ठेवणाऱ्या पुरुषांच्या मनात महिलांविषयीचा आदर आपोआप वाढतो, असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी केले.

महावितरणमध्ये कार्यरत असलेल्या महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी गणेशखिंड येथील प्रकाशभवन सभागृहात बुधवारी (दि. १४) आयोजित करण्यात आलेल्या ‘सन्मान सौदामिनींचा’ या विशेष सोहळ्यात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, सुरेश सवाईराम, सहायक महाव्यवस्थापक (विवले) कीर्ती भोसले, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) सत्यजित राजेशिर्के व दीप्ती अंबेकर, कार्यकारी अभियंता अपर्णा मुनशेट्टीवार, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भूपेंद्र वाघमारे, उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पटणी यांच्यासह महावितरणमधील महिला अभियंता, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर म्हणाले की, कालबाह्य झालेल्या कर्मचारी कल्याण योजनांना काळानुरूप स्वरूप देतानाच संचालक श्री. राजेंद्र पवार यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत भरघोस वाढ केली आहे. महिला एकदा एखादे काम पूर्ण करण्याचा निर्धार करतात, तेव्हा ते पूर्ण केल्याशिवाय मागे हटत नाहीत. त्यांच्या या जिद्दीचा आणि कर्तृत्वाचा गौरव होणे आवश्यक आहे.

यावेळी कार्यकारी अभियंता अपर्णा मुनशेट्टीवार, जलतरणपटू नेहा बनसोड, हिना कुरणे, अनिता वाकसे, भाग्यश्री जोशी, नितल हासे, शितल बोथे आणि सुरभी टाकसाळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील अनुभव आणि वाटचालीतील विविध पैलू उपस्थितांसमोर मांडले.

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व महिलांचा गुलाबपुष्प आणि पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भक्ती जोशी व स्वागती सोळंकुरे यांनी केले, तर आभार अधीक्षक अभियंता सिंहाजीरा.व गायकवाड यांनी मानले.

थोडे नवीन जरा जुने