MGID Header Code
Code End

कृष्णानगर संविधान चौकातील ड्रेनेज चेंबर चोकअप; कृष्णानगर ते साने चौकापर्यंत सांडपाणी रस्त्यावर

 


दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कारवाईकडे दुर्लक्ष

पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील कृष्णानगर येथील संविधान चौकात ड्रेनेज चेंबर चोकअप झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या कालपासून चेंबर चोकअप झाल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत असून, कृष्णानगर चौकापासून साने चौकापर्यंत सांडपाण्याचा प्रवाह सुरू आहे.

या सांडपाण्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

या गंभीर समस्येबाबत संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना माहिती देऊनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मारुती गणपत जाधव यांनी केली आहे.


"नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. वारंवार तक्रार करूनही समस्या सोडवली जात नसेल, तर नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची?" असा सवाल मारुती जाधव यांनी उपस्थित केला.

संबंधित महापालिका प्रशासनाने तातडीने ड्रेनेज चेंबरचा चोकअप काढून सांडपाण्याचा प्रवाह थांबवावा, परिसराची स्वच्छता करावी आणि भविष्यात अशा समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेतून तात्काळ मुक्त करा, अशी मागणी मारुती गणपत जाधव यांनी केली आहे.

 मारुती गणपत जाधव

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

कृष्णानगर, पिंपरी-चिंचवड


थोडे नवीन जरा जुने