MGID Header Code
Code End

आळंदीत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात ; ९६ टक्के उद्दिष्ट पूर्ण


उर्वरित लाभार्थ्यांसाठी घरभेटीतून लसीकरण  

आळंदी (अर्जुन मेदनकर) : पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे व ठाणे जिल्ह्यात तसेच नवी मुंबई, ठाणे, पुणे व बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात आयोजित करण्यात आली.

या लसीकरणाचा प्रारंभ आळंदी ग्रामीण रुग्णालयात नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, वारकरी महामंडळ पुणे जिल्हा अध्यक्ष विलास तात्या बालवडकर महाराज, माजी विरोधी पक्षगटनेते डी. डी. भोसले पाटील, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण, शेतकरी बचाव आंदोलनाचे उपाध्यक्ष बाळासाहेब पेठकर, अरुण कुरे, महादेव पाखरे, अनिल जोगदंड, अक्षराज गोरे, गोविंद ठाकूर पाटील, कृष्णाजी डहाके आदी मान्यवरांचे उपस्थितीत लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली. 

आळंदी शहरात ग्रामीण रुग्णालय आळंदी यांच्यातर्फे पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. यासाठी ६२८७ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ६०३६ लाभार्थ्यांना पोलिओची लस पाजण्यात आली व ९६ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले.


उर्वरित लाभार्थ्यांना सोमवार दि. २३ ते २७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत घरोघरी फेरी देऊन पोलिओची लस पाजली जाणार आहे. वंचित लाभार्थ्यांच्या पालकांनी याचा लाभ घ्यावा व आपले पाल्य सुरक्षित करून घ्यावे, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी केले.

आळंदी शहरामध्ये एकूण १८ पोलिओ बूथ व एक मोबाईल टीम यांच्या माध्यमातून हे कामकाज करण्यात आले.

थोडे नवीन जरा जुने