MGID Header Code
Code End

दिवाळीच्या अनोख्या शुभेच्छा

 

वंचितांची दिवाळी गोड करण्यातच खरा आनंद! – डॉ. किशोर थोरात

सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या ‘एक हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत वृद्धाश्रम व दिव्यांग मुलांच्या आश्रमात दिवाळी फराळाचे वाटप

पुणे : सामाजिक बांधिलकी जपत समाजातील वंचित, निराधार, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याच्या उद्देशाने सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ‘एक हात मदतीचा’ या सामाजिक उपक्रमांतर्गत दिवाळी फराळ दान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमांतर्गत इंद्रायणी वृद्धाश्रम, तळवडे तसेच वात्सल्य दिव्यांग मुलांचा आश्रम, येळवडी, देहू येथे दिवाळी फराळाचे वाटप करून तेथील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मुलांसोबत आनंदाची दिवाळी साजरी करण्यात आली. सण-उत्सवांचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा आणि वंचितांच्या जीवनातही आनंदाचे क्षण निर्माण व्हावेत, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू होता.

हा सामाजिक उपक्रम खालील संस्था व व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला.

1. सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य

2. कुलस्वामिनी असोसिएटस, पुणे

3. वृंदावन मिसळ, पुणे

4. श्री समर्थ शैक्षणिक व सामाजिक संस्था, पुणे

5. अथर्व वॉटर टेक सोल्युशन्स, पुणे

6. अमुकेट प्रोडक्ट अँड टेक सोल्युशन्स प्रा. लि., पुणे

7. कॉन्फ्लुएन्स टेक्नॉलॉजी, पुणे

8. शनि प्रसाद ट्रान्सपोर्ट, पुणे

9. श्री गणेश कृषी सेवा केंद्र, ओतूर

10. राशी डिजिटल मार्केटिंग सोल्युशन्स, पुणे

या उपक्रमासाठी संघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष डॉ. किशोर आण्णासाहेब थोरात, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अमित कोकणे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री. रवींद्र आळणे आणि पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. भगवान वायकर उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. किशोर थोरात म्हणाले की, “आपली दिवाळी तर दरवर्षी गोड होतच असते; परंतु आपल्या आनंदात समाजातील वंचित, निराधार आणि दिव्यांग बांधवांनाही सहभागी करून त्यांची दिवाळी गोड करण्यातच खरा आनंद आहे. दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई, मिठाई आणि फराळ नव्हे, तर दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण करणे होय. समाजातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने आणि आनंदाने सण साजरा करता यावा, यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे.”

समाजातील गरजू घटकांपर्यंत मदत पोहोचविणे, सामाजिक संवेदनशीलता जपणे आणि सेवाभावाची भावना नव्या पिढीमध्ये रुजविणे, या उद्देशाने सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमातून केवळ वस्तूंचे दान न करता माणुसकी, आपुलकी आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

या उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या सर्व संस्था, व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि पदाधिकाऱ्यांचे संघाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

“दिवाळीचा खरा प्रकाश दिव्यांमध्ये नसतो, तो दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलणाऱ्या हास्यामध्ये असतो!”

– सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ, महाराष्ट्र राज्य

ADVT

--------------

---------

----------




थोडे नवीन जरा जुने