पिंपरी चिंचवड - आंतरराष्ट्रीय योग दिन" अभिराज फाउंडेशन" या स्वमग्न, बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली अनमोल देणगी म्हणजे योग या योगशास्त्राच्या माध्यमातून व्यक्तीच्या सामाजिक, आरोग्य व अध्यात्मिक प्रगतीसाठी लाभदायक ठरत आलेली आहे.या दिवसाचं औचित्य साधून अभिराज फाउंडेशन या दिव्यांग मुलांच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून ताडासन, भुजंगासन,पद्मासन वज्रासन, सुप्त वज्रासन, धनुरासन, शवासन या प्रकारची योगासने विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने केली. यावेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व महिला शिक्षकांनी योगासनाचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवले.
विद्यार्थ्यांना दररोज योगासने करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले योग साधनेमुळे आरोग्य सुधारते, मनशांती लाभते, हाडांना बळकटी प्राप्त होते, आत्मविश्वास वाढतो या गोष्टींचा योगासनामुळे आपल्या आयुष्यामध्ये आरोग्यदायी लाभ होतो हे विद्यार्थ्यांना व पालकांना सांगण्यात आले.
योग दिनानिमित्त अभिराज फाउंडेशनच्या मुख्याध्यापिका अनिता चव्हाण व सर्व शिक्षक वर्ग स्टाफ यांनी मेहनत घेतली, अभिराज फाउंडेशनचे डायरेक्टर रमेश मुसूडगे व स्वाती तांबे यांनी" शुभेच्छा दिल्या.