Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, इराणमधील अण्वस्त्र केंद्रांवर (Iran Nuclear Sites) 'प्रचंड नुकसान' झाले असून, याला 'Obliteration' (पूर्ण नष्ट होणे) हा शब्द योग्य ठरेल. त्यांनी हा दावा Truth Social या स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केला आहे.
त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, 'Satellite Images' द्वारे हे स्पष्ट होते की, इराणमधील सर्व अण्वस्त्र स्थळांवर Monumental Damage झाले आहे. Obliteration Is An Accurate term! ही पांढरी संरचना दगडात खोलवर बसवलेली आहे, तिचे छप्परही जमिनीखाली आहे, आणि ती पूर्णपणे आगीतून सुरक्षित आहे. सर्वात मोठे नुकसान जमिनीखाली खोलवर झाले आहे. Bullseye!" असे ट्रम्प यांनी म्हटले. हे विधान अमेरिकेने Operation Midnight Hammer अंतर्गत इराणमधील तीन प्रमुख अण्वस्त्र केंद्रांवर – Fordow, Natanz आणि Isfahan – केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर दुसऱ्याच दिवशी आले आहे.
या हल्ल्यांमध्ये अमेरिकेच्या लष्कराने अचूक लक्ष्य साधले.