!-- afp header code starts here --> रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले

रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले


Randeep Hooda : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) सध्या त्याच्या 'जात' या नवीन चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. आता तो आणखी एका मोठ्या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपट देशभक्तीवर आधारीत आहे. त्याने 'ऑपरेशन खुकरी' या सैन्यावर आधारित पुस्तकाचे चित्रपट हक्क विकत घेतले आहेत. लवकरच तो या पुस्तकावर चित्रपट बनवण्याची तयारी करेल.

व्हरायटी डॉट कॉमच्या वृत्तानुसार, रणदीप हुड्डाने 'ऑपरेशन खुकरी: द अनटोल्ड स्टोरी ऑफ द इंडियन आर्मीज ब्रेव्हेस्ट पीसकीपिंग मिशन अब्रोड' या पुस्तकावर आधारित चित्रपट बनवण्याचे अधिकृत अधिकार मिळवले आहेत.

हे पुस्तक मेजर जनरल राजपाल पुनिया आणि दामिनी पुनिया यांनी लिहिले आहे. लवकरच तो या सत्य घटनेवर आधारित चित्रपट बनवण्याच्या तयारीला लागेल. 'ऑपरेशन खुकरी' हा चित्रपट 2000 मध्ये घडलेल्या वास्तविक जीवनातील घटनेवर आधारीत आहे.

थोडे नवीन जरा जुने