पिंपरी चिंचवड - केशवनगर, चिंचवड येथे मोरया गोसावी क्रिडांगण आहे, या मैदानावर अनेक खेळाडू येत असतात, तसेच व्यायामासाठी नागरिक, महिला येत असतात त्यांची सुलभ सौचालयाची गैर सोय होऊ नये, म्हणून त्या ठिकाणी सुलभ स्वच्छतागृह बनविले आहेत. त्यांचे काही महिन्यांपूर्वीच नूतनीकरण झाले आहे पण सध्याची स्थिती पहिली तर अत्यंत दयनीय अवस्था आहे.
कमोड, खराब असून बॉक्स तुटलेले,आहे, बादली ठेवणे आवश्यक आहे, पण अत्यन्त वाईट स्थितीचा डब्बा ठेवला आहे. आदी तक्रारी नागरिकांनी महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांच्याकडे केल्या होत्या. त्यावर मधुकर बच्चे यांनी आधी स्वतः जाऊन पाहणी केली तेव्हा तेथील अनेक गैरसोयी निदर्शनास आल्या. वरील बाबींना नक्की कोण जबाबदार? असा सवाल नागरिक विचारत आहेत.
या ठिकाणी दर्जाहीन साहित्य दिसत आहे याला जबाबदार व्यक्ती निष्काळजी वागत असतील तर या सर्व बाबी महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी 'ब' क्षेत्रीय अधिकारी किरण कुमार मोरे यांच्याशी चर्चा करून सविस्तर माहिती दिली व निवेदन दिले.
या ठिकाणी वापरलेले साहित्य कोणत्या दर्जाचे आहे तेही तपासले पाहिजे प्रत्येक वेळी प्रशासनचुका नागरिकांवर ढकलून मोकळे होत असते. पण सार्वजनिक ठिकाणी साहित्याचा दर्जा कसा पाहिजे.
येथील सर्व सोयीसुविधा योग्य आणि दर्जेदार द्याव्यात यासाठी निवेदन देण्यात आले.
यावर त्वरित कार्यवाही केली जाईल व पुढे अश्या होणार नही याची काळजी घेतले जाईल असे किरण कुमार मोरे यांनी आश्वासन दिले.