पुणे : स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना या संघटनेची डंकन इंजिनिअरिंग लि. या कंपनीमध्ये संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक रोहिदास गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापना झाली.
उद्घाटनाच्या निमित्ताने प्रमुख उपस्थिती स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेचे प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, कामगार नेते किसनराव बावकर, भाजपा नेते श्रीकृष्ण देशमुख, कामगार नेते नानासाहेब लांडे, आणि स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष - जीवन येळवंडे, सरचिटणीस - कृष्णा रोहोकले, चिटणीस - रघुनाथ मोरे, खजिनदार - अमृत चौधरी, संघटक - रवी भालेराव, भट्टू पाटील, आदी मान्यवर, आणि कंपनी व्यवस्थापन एच. आर. हेड कोकणे, एच. आर - केवलशिंग राजपूत, युनिट प्रतिनिधी दत्तात्रय सुक्रे व इतर पदाधिकारी आणि बहुसंख्य कामगार बंधू उपस्थित होते.
संघटनेच्या उद्घाटना निमित्ताने आमदार महेश लांडगे यांनी कामगार व व्यवस्थापन यांना मार्गदर्शन करत असताना सांगितले की, स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना ही नेहमी कंपनी आणि कामगारांच्या हिताचे निर्णय घेत असते. त्यामुळे सर्व कामगार बांधवांनी कंपनी आपली आहे.
ही विचार भावना मनात ठेवून कंपनीसाठी काम करावे आणि व्यवस्थापनानेही कामगारांवर अन्याय करू नये, कामगारांना सहकार्य करावे, आणि एकत्रितपणे एक विचाराने काम करून औद्योगिक विकास करावा. तसेच संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे यांनीही कामगार व व्यवस्थापन यांना मार्गदर्शन केले आणि संघटनेचे सरचिटणीस कृष्णा रोहोकले यांनी सर्व कामगारांना मार्गदर्शन करून, उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता पूर्ण केली.