ई-बाईक सेवेला विरोध तीव्र विरोध
मुंबई : महाराष्ट्र सरकारने प्रवासी वाहतुकीसाठी अॅप आधारित रिक्षा, टॅक्सी आणि ई-बाईक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, खासगी कंपन्यांच्या मक्तेदारीला पर्याय निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, या अॅपला ‘जय महाराष्ट्र’, ‘महा-राईड’, ‘महा-यात्री’ किंवा ‘महा-गो’ यापैकी एक नाव देण्याचा प्रस्ताव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या अंतिम मान्यतेनंतर हे अॅप लवकरच कार्यान्वित होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
या उपक्रमासाठी ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी’ आणि ‘मित्र’ यासारख्या संस्थांसह खासगी कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारच्या अॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वांनुसार अॅपची नियमावली अंतिम टप्प्यात आहे. यामुळे प्रवाशांसह चालकांनाही फायदा होईल आणि लाखो तरुण-तरुणींना आत्मनिर्भर बनण्याची संधी मिळेल, असे सरनाईक यांनी नमूद केले.
या निर्णयाचे महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी स्वागत केले आहे. मात्र, त्यांनी ई-बाईक सेवेला विरोध दर्शवला आहे.
डॉ. बाबा कांबळे म्हणाले, “आम्ही अनेक वर्षांपासून सरकारने स्वतःचे मोबाईल अॅप विकसित करावे, अशी मागणी करत आहोत. हा निर्णय आमच्या मागणीचा विजय आहे. परंतु, ई-बाईक सेवेमुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ही सेवा योजनेतून वगळण्यासाठी आम्ही परिवहन मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागणी करू.”
डॉ. बाबा कांबळे यांनी नुकतीच परिवहन मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत ओला, उबेरसारख्या खासगी कंपन्यांमुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांची होणारी पिळवणूक आणि इतर प्रश्न मांडले होते. त्यावेळी प्रताप सरनाईक यांनी सरकारकडून योग्य तो न्याय मिळेल, असे आश्वासन दिले होते. “हा निर्णय रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी दिलासा देणारा आहे. आमच्या मागण्यांना यश मिळाले आहे,” असे डॉ. बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
डॉ. बाबा कांबळे यांचा ई-बाईक सेवेला आमचा तीव्र विरोध असून या प्रश्नावरती आम्ही, वेळ आल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील दिला आहे,
अधिक माहितीसाठी संपर्क
डॉ. बाबा कांबळे
राष्ट्रीय अध्यक्ष, मो 9850732424,