PCMC : "अभिराज फाउंडेशन "चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

 


पिंपरी चिंचवड - अभिराज फाउंडेशन, वाकड येथे आज दिनांक 21 जुलै 2025 रोजी संस्थेचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

यावेळी विद्यार्थीनी व कर्मचाऱ्यांनी शाळेला सजावट केली होती. रांगोळी व फुलांच्या सजावटीत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

संस्थेच्या प्रिन्सिपल अनिता चव्हाण यांनी मार्गदर्शक भाषण केले. व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. सर्व मुलांचे विविध खेळ घेण्यात आले. 


यामध्ये टार्गेट गेम.... ग्लासचा मनोरा रचणे ... तीन पायाची शर्यत...तसेच झुम्बा डान्स.. हे कार्यक्रम घेण्यात आले. 

सर्व कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते. श्री रमेश मुसूडगे कार्यक्रमाला उपस्थित होते. अभिराज फाउंडेशनच्या डायरेक्टर स्वाती तांबे व रमेश मुसुडगे  यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यात दिल्या. यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

अशाप्रकारे "अभिराज फाउंडेशनचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

थोडे नवीन जरा जुने