पिंपरी चिंचवड : लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर अँक्टिव्हच्या सदस्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २० जुलै २०२५ रोजी हॉटेल अंबियन्स, वाकड येथे संपन्न झाली.
यावेळी सर्व मान्यवर सदस्यांनी लायन बालाजी जगताप यांची लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर अँक्टिव्हच्या अध्यक्षपदी एकमताने निवड केली.
सन्माननीय पदाची शपथ घेतल्याचा मला अभिमान आहे - लायन बालाजी जगताप
यावेळी लायन बालाजी जगताप, अध्यक्ष — लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर अॅक्टिव्ह यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, आज या सन्माननीय पदाची शपथ घेतल्याचा मला अभिमान आहे.
आजच्या या विशेष प्रसंगी डिजिटल मीडियाच्या माध्यमातून मला माझ्या भविष्यातील काही महत्त्वाच्या योजना आपल्यासमोर मांडायच्या आहेत. आणि समाजातील गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकांचे सक्षमीकरण करायचे आहे.
आमचा क्लब समाजहितासाठी कटिबद्ध असून, पुढील वर्षात खालील उपक्रम हाती घेतले आहेत.
1. पर्यावरण संवर्धन – वृक्षारोपण, करुन त्याचे संवर्धन करणे, झाडाना संरक्षक जाळी बसवून तीन वर्षासाठी त्या झाडाचे पालकत्व घेऊन त्याचे संगोपन करणे. तसेच स्वच्छता मोहिमा आणि हरित पुण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.
2. आरोग्य सेवा – मोफत आरोग्य तपासणी शिबिरे घेणे समाजात कॅन्सर बद्दल जनजागृती करणे.
3. शिक्षण – गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन. व आर्थिक मदत करणे. व डिजीटल बोर्डे पुरवणे.
4.अन्नदान – गरजू पर्यंत पोहचून कोणीही भुकेला राहिला नाही पाहिजे या साठी अन्नदान करणे.
5. निसर्ग आणि ज्ञान जागृती – पर्यावरण व विज्ञान विषयक जनजागृती सत्रे घेणे, तज्ज्ञ सल्लागार यांच्या साहाय्याने स्कूल कॉलेज येथे विशेष उपक्रम राबवणे.
6. रक्तदान शिबिरे – नियमित रक्तदान शिबिरे आयोजित करणे.
7. व्हिजन प्रोजेक्ट– नया सवेरा हा पंचवार्षिक अंधत्व निर्मूलन चा उपक्रम असून, प्रत्येक दात्या पर्यंत पोहचून डोळे दान करून घेणे व नेत्र पेढी च्या माध्यमातून गरजू पर्यंत ते पोहचविणे यात दुवा म्हणून कार्य करणे हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे जो आमचे प्रांतपाल एम जे एफ लायन राजेश अग्रवाल यांचे स्वप्न आहे — वा वर काम निरंतन कार्यरत राहणे.
8. सदस्यवाढ – नविन सदस्य जोडून समाजकार्याची कार्यक्षमता वाढवणार.
9. स्थायी प्रकल्प – क्लबचा दीर्घकालीन पर्मनंट प्रोजेक्ट करुन सामाजिक उपक्रम सुरू ठेवणार.
10. फंड रायझिंग – सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी निधी संकलनाचे विविध कार्यक्रम घेणे.
या सर्व योजनांद्वारे आम्ही समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करनार आहोत, यात मला खात्री आहे की, सर्व क्लब सदस्य, नागरिक, व मीडिया यांचे सहकार्य आम्हाला लाभेल. असे लायन बालाजी जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.
“We Serve” या आमच्या घोषवाक्याला अनुसरून, हे वर्ष लोकांसाठी आणि समाजासाठी समर्पित राहील.
यावेळी इनस्टॉलिंग ऑफीसर PDG MJF लायन राज भाई मुच्छाळ यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष लायन बालाजी जगताप आणि त्यांचे बोर्ड ऑफ डायरेक्टर यांना पदांची शपथ देण्यात आली.
सचिव लायन डॉ.ज्योती क्षीरसागर, खजिनदार लायन जितेंद्र हिंगणे, कन्व्हेनर लायन शोभा कदम, मावळते अध्यक्ष एम जे एफ लायन सुनील जाधव, सचिव लायन धनंजय माने, ज्येष्ठ लायन दिपक सोनार, लायन संजय सोनार, MJF Ar लायन ऋषिकेश देवरे, लायन शिरीष हिवाळे, लायन प्रो. शकुर सैय्यद, लायन धनंजय माने, लायन योगेश नाईक, लायन बंकट माने, लायन अरुण इंगळे, लायन भाग्यलक्ष्मी कतारी, लायन भरत अंकुशे , लायन अंजुम सैय्यद,लायन सुधीर पाटील,लायन गुलशन नाईकुडे, लायन दीपा जाधव लायन वंदन कांबळे, सुवर्णा माने, वैष्णवी जगताप, निलेश जगताप, विशाल सातकर व क्लब मधील इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते.
तसेच द्वितीय प्रांतपाल MJF लायन राजेंद्र गोयल यांनी नवीन सदस्य यांना लायनिझम ची विधिवत शपथ देऊन क्लब मधे सामील करुन घेण्यात आले.
या वेळी ZC लायन उज्ज्वला कुलकर्णी विशेष उपस्थिती लाभली, या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड परिसरातील इतर क्लब चे मान्यवर पदाधिकारी, कॅबिनेट ऑफीसर, अध्यक्ष, सचिव व इतर नातेवाईक उपस्थित होते.