PCMC : गुरू जेष्ठ स्थानी असतो म्हणूनच जेष्ठांचा सन्मान करणे हा एक भाग्याचा क्षण असतो - मधुकर बच्चे



पिंपरी चिंचवड : गुरुपौर्णिमा हा धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो.

गुरु - शिष्य नात्यामुळे सर्वव्यापी ज्ञान" प्राप्त होते, गुरु हा जेष्ठ स्थानी असतो म्हणूनच जेष्ठांचा सन्मान करणे हा एक भाग्याचा क्षण असतो. असे सामाजिक कार्यकर्ते काकडे टाऊन शिप ओम गणेश सोसायटीचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी सांगितले.

चिंचवड मधील काकडे टाऊन शिप ओम गणेश सोसायटीत गुरु पौर्णिमेनिमित्त  विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सोसायटीत कायमच सर्व सण  वेगळ्या पद्धतीने,आपली संस्कृती जपत,आदर्शवाद सांभाळत सण साजरे केले जातात.

गुरुपोर्णिमा निमित्त श्री दत्त व स्वामी मूर्ती पूजन करून सोसायटीतील जेष्ठांचे औक्षण,पूजन करून त्यांचा आदरपूर्वक सत्कार करण्यात आला. अतिशय भावनिक,असा हा कार्यक्रम आयोजित केला होता.



अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी ही संकल्पना मांडली व त्याला सर्व पदाधिकारी ,सदस्य यांनी त्वरित अनुमोदन दिले. जवळपास 25/30 जेष्ठांचा औक्षण करून,पूजन करून,फुलांची उधळण करीत, श्रीफळ, गुलाब, माऊलींचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात सर्व जेष्ठ भाराऊन गेले होते अनेकांनी अतिशय भावनिक व सध्या स्थितीवर मनोगत व्यक्त केले.

महाआरती,भजन,अनेकांचे भावनिक मनोगत,महाप्रसाद व भोजन असा जल्लोषात, मोठ्या संख्येने उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यात महिलांची संख्या मोठी होती

श्री दत्त आरती मंडळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कमिटी पदाधिकारी अध्यक्ष मधुकर बच्चे,खजिनदार अजित नाईक, सेक्रेटरी राजू कोरे यांनी या कार्यक्रम साठी सहकार्य केले.


थोडे नवीन जरा जुने