PCMC : विविध रुढी व परंपरां मुळेच भारतीय संस्कृती आजपर्यंत टिकुन आहे व टिकुन राहिल - डॉ. अजित जगताप

 


संस्कृती संवर्धन भजन महासंघ चिंचवड विभागाचा भजन सादरीकरण महोत्सव संपन्न!

पिंपरी चिंचवड - स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, संस्कृती संवर्धन विकास महासंघ विभाग अंतर्गत संस्कृती संवर्धन भजन महासंघ चिंचवडगाव च्या वतीने दरवर्षीप्रमाणे आषाढ मास निमित्त श्री राम मंदिर येथे परिसरातील अनेक भजनी मंडळ एकत्र येत "भजन सादरीकरण महोत्सव" साजरा केला.

अनादी कालापासून भारतीय संस्कृती, विविध रूढी, परंपरा आजपर्यंत टिकून आहे आणि तो टिकून राहील, यामध्ये स्त्रीशक्तीचा प्रचंड मोठा वाटा आहे. असे डॉक्टर अजित जगताप यांनी आपल्या मनोगतात म्हणाले.

चिंचवड मधील सर्व भजनी मंडळांनी मिळून खऱ्या अर्थाने "जाऊं देवाचिया गांवां ...." हा अप्रतिम कार्यक्रम सादर केला. प्रत्येक सहभागी भजनी मंडळांनी भजन व गवळण अत्यंत उत्कृष्ट प्रकारे सादर केले.

निलम शिंदेंनी सादर केलेले नारदीय कीर्तनाने कार्यक्रमाची अध्यात्मिक उंची वाढली. याच वर्षी अश्विनी मोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेले "टाळ पाऊल पथक" छान सादरीकरण करत आपली यशस्वीतेचा पताका फडकविला, यात विविध भजनी मंडळातील सभासदांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

कार्यक्रम  यशस्वी करण्यासाठी  माधुरी कवी, उज्वला कवडे, प्रिया जोग, अश्विनी नाटेकर, अंजलीत कुलकर्णी, सुषमा वैद्य यांनी परिश्रम केले.

हरीभाऊ क्षीरसागर, डॉ.अजित जगताप, मनी बावळे, रवि कळंबकर, सुरेश भोईर, अश्विनी  चिंचवडे व शिवानंद चौगुले यांच्यासह परिसरातील अनेक नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला.

भारत माता पूजनाने कार्यक्रमाचे सुरुवात झाले व सामुदायिक पसायदान व चहापानाने कार्यक्रमाचे सांगता झाली.

माधुरी कवी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.


थोडे नवीन जरा जुने