नागपंचमीचे पूजन आणि झोक्याचे उद्घाटन माजी नगरसेविका योगिता नागरगोजे व पुष्पा बोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व महिलांनी मनोभावे नागाची पूजा केली आणि झोका खेळण्याचा आनंद लुटला.
यावेळी झिम्मा, फुगडी, फेर, गाणी, उखाणे इत्यादी पारंपारिक खेळांचे आयोजन देखील करण्यात आले होते. नागपंचमी हा श्रावण महिन्यातला पहिला सण आहे, ज्यामध्ये शेतकऱ्याचा मित्र असलेल्या नागदेवाचे पूजन करण्यात आले.
महिला मंडळाच्या स्नेहा गुणवंत कार्याध्यक्षा सारिका रिकामे, क्षमा काळे, अंजली देव, स्मिता सिरसाठ, मंगल काळे, प्रीती झोपे, सविता राणे, नीलिमा भंगाळे यांच्यासह इतर सदस्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.