!-- afp header code starts here --> वुई टुगेदर फाउंडेशनच्या फाउंडर सभासद सौ. शैलजा कडुलकर यांचे निधन

वुई टुगेदर फाउंडेशनच्या फाउंडर सभासद सौ. शैलजा कडुलकर यांचे निधन


पिंपरी चिंचवड : वुई टुगेदर फाउंडेशनचे संस्थापक श्री. क्रांतीकुमार कडुलकर यांच्या सुविद्य पत्नी तसेच संस्थेच्या फाउंडर सभासदांपैकी एक सौ. शैलजा कडुलकर यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

सौ. शैलजा कडुलकर या सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेणाऱ्या आणि वुई टुगेदर फाउंडेशनच्या विविध उपक्रमांमध्ये सातत्याने योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या शांत, संयमी आणि सेवाभावी स्वभावामुळे सामाजिक क्षेत्रात त्यांना विशेष मान मिळाला होता.

त्यांच्या निधनामुळे कडुलकर परिवारावर तसेच सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली असून विविध स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, सौ. शैलजा कडुलकर यांच्यावर आज सायंकाळी सुमारे ४ वाजता चिखली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.

थोडे नवीन जरा जुने