पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) अभिराज फाउंडेशन वाकड येथे दिनांक २९ जुलै २०२५ रोजी नागपंचमीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. त्यासाठी शाळेतच मातीचा नाग मुलांच्या मदतीने बनवण्यात आला.
शाळेची सजावट करण्यात आली. सर्व शिक्षक आणि मुलांनी मिळून नागाची विधिवत पूजा केली. याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका विद्या मॅडम यांनी नागपंचमीच्या सणाविषयी मुलांना माहिती दिली. त्यानंतर सर्व महिला शिक्षिका आणि कर्मचाऱ्यांनी मिळून पारंपारिक गाणी म्हटली आणि मुलांना घेऊन फेर धरला. तसेच झिम्मा,फुगडी असे पारंपारिक खेळ खेळण्यात आले. त्यानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.
अशाप्रकारे अभिराज फाउंडेशन शाळेत नागपंचमीचा सण पारंपारिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नागपंचमी सणानिमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता चव्हाण, डायरेक्टर स्वाती तांबे, रमेश मुसूडगे यांनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.