TCS कंपनी १२,००० कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत

TCS company preparing to lay off 12,000 employees


TCS : भारताची सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीने पुढील वर्षभरात सुमारे १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा मोठा परिणाम मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांवर होणार आहे.

TCS चे CEO कृषीवासन यांनी Moneycontrol ला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “कंपनीला अधिक चपळ आणि भविष्यकाळासाठी तयार ठेवण्यासाठी” ही पावले उचलली जात आहेत. तंत्रज्ञानातील झपाट्याने होणारे बदल आणि AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) चा वाढता वापर हे यामागचे प्रमुख कारण असल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले गेले.

AI मुळे बदललेली गरज

CEO कृषीवासन म्हणाले, “काम करण्याच्या पद्धती बदलत आहेत आणि प्रत्येक कंपनीला यशस्वी होण्यासाठी नव्या कौशल्यांची गरज आहे. आम्ही AI आणि ऑपरेटिंग मॉडेलमधील बदलांकडे लक्ष दिले आहे. काही विभागांत कर्मचाऱ्यांचे पुनर्नियोजन (redeployment) प्रभावी ठरलेले नाही, त्यामुळे काही भूमिका हटवाव्या लागत आहेत.”

6.13 लाख कर्मचाऱ्यांपैकी 2 टक्के कर्मचाऱ्यांना हटवले जाणार म्हणजेच सुमारे १२,२०० कर्मचाऱ्यांवर हा परिणाम होणार आहे.

हे AI मुळेच आहे का?

कंपनीचा अधिकृत दावा आहे की, "हा निर्णय केवळ AI मुळे नाही," पण विश्लेषकांचे म्हणणे आहे की AI आणि ऑटोमेशनमुळे हाताने होणाऱ्या चाचण्या (manual testing) यासारख्या कामांची गरज कमी झाली आहे, त्यामुळे अनेक अनुभवी कर्मचाऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे कठीण जात आहे.

प्रभावित कर्मचाऱ्यांना दिलासा

कंपनीने सांगितले की, प्रभावित कर्मचाऱ्यांना सेव्हरन्स पॅकेज, नोटीस कालावधीसाठी पगार, वाढवलेले आरोग्य विमा संरक्षण आणि नव्या नोकरीसाठी मदत (outplacement assistance) दिली जाईल.

‘बेंच’ मॅनेजमेंटवर नव्या दृष्टिकोनातून विचार

CEO कृषीवासन म्हणाले, “हे काही efficiency drive नाही. आम्हाला फक्त हे पाहायचे आहे की आमचे कर्मचारी वर्षभर उत्पादकतेने काम करत राहावेत आणि ग्राहक प्रोजेक्ट्समध्ये सामील व्हावेत.”

एप्रिल ते जून २०२५ या तिमाहीत TCS ने प्रत्यक्षात ६,०७१ नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली होती. मात्र आता कंपनीचा लक्ष फक्त संख्येवर नसून योग्य कौशल्यांसह भविष्यकाळासाठी तयार असलेल्या कर्मचाऱ्यांवर आहे.

TCS-company-preparing-to-lay-off-12000-employees

थोडे नवीन जरा जुने