इंदापूर येथे महसूल दिनानिमित्त कृषीमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. त्यावेळी भरणे यांनी आपल्या भाषणात म्हटले, "सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ जे करतात, त्याची माणसं नोंद ठेवतात." या विधानाचा अर्थ अस्पष्ट असला, तरी यामुळे उपस्थित अधिकारी आणि कार्यकर्ते गोंधळात पडले. या वाक्याचा नेमका अर्थ काय यावरून आता उलट-सुलट चर्चा रंगू लागली आहे.
भरणेंनी केलेल्या या वक्तव्यामुळं वादाची चिन्हं आहेत. वाकडं काम केल्यावर ते नियमात कसं बसवता येतं? असा खोचक सवाल विरोधक त्यांना विचारत आहेत. तर सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू असून, भरणे यांच्या मंत्रिपदाच्या कारकीर्दीची सुरुवातच वादाने झाल्याची चर्चा आहे.
Agriculture-Minister-Dattatreya-Bharane-makes-controversial-statement-within-24-hours