PCMC : पिंपळे सौदागर येथील पी.के. चौकात भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू – नगरसेवक नाना काटे यांची तत्काळ मदत

 


पिंपरी चिंचवड - पिंपळे सौदागर येथील पी.के. चौकात आज सकाळी एक भीषण अपघात घडला. चिचवड येथील एक दुचाकीस्वार ॲक्टिव्हा वाहनावरून कोकणे चौकाच्या दिशेने जात असताना त्याच्या दुचाकीवर कंटेनर स्वरूपाच्या RMC वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती समजताच स्थानिक नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सांगवी पोलीस ठाणे, वाहतूक विभाग, ॲम्बुलन्स सेवा यांना तातडीने सूचना देऊन सर्व आवश्यक मदत कार्य तत्काळ सुरू केलं. अपघातग्रस्ताला मदतीचा हात देत त्यांनी घटनास्थळी नागरिकांचीही समजूत घातली.

याप्रसंगी सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि वाहतूक विभागाचे अधिकारीही घटनास्थळी पोहचले. अपघातास कारणीभूत ठरलेल्या जडवाहनांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना माजी नगरसेवक काटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

हा अपघात पिंपळे सौदागर परिसरातील वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहनचालक आणि जड वाहनांच्या वर्दळी मुळे झालेला आहे, या संदर्भात प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

थोडे नवीन जरा जुने