ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवाराचे उपक्रमास प्रतिसाद
आळंदी (अर्जुन मेदनकर) : धानोरे येथील पुणे जिल्हा परिषद आदर्श शाळा आणि मुख्यमंत्री माझी शाळा पारितोषिक प्राप्त धानोरे या शाळेत ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमातील सन २०२५ - २०२६ या शैक्षणिक पर्वातील उपक्रमाचा प्रारंभ आणि ,मागील वर्षातील यश प्राप्त गुणवंत मुलांना पारितोषिके प्रदान सोहळा नाम जयघोषात संपन्न झाला.
या प्रसंगी व्यासपीठावर देठे महाराज, तुकाराम महाराज ताजने, विश्वकर्मा महाराज पांचाळ, ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवारातील घटक अर्जुन मेदनकर, विश्वम्भर पाटील, सोपानकाका काळे, धनाजी काळे,अँड. प्राजक्ता हरपळे भोसले, ज्ञानेश्वर जाधव, दिनेश कुऱ्हाडे, सुहास सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनीता गावडे मुख्याध्यापक सत्यवान लोखंडे शाळेतील शिक्षकवृंद आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी श्रींचे प्रतिमा, मूर्ती पूजन, दीपपूजन उपस्थित मान्यवरांचे हस्ते झाले.
यात सायकल बक्षीसाचे प्रायोजक अॅड. प्राजक्ता हरपळे-भोसले, प्रगतशील शेतकरी व व्यवसायीक सोपान-काका काळे, विष्णू महाराज देठे मुख्याध्यापक श्री सत्यवान लोखंडे अर्जुन मेदनकर, दिनेश कु-हाडे, सायकल बक्षीसाचे प्रायोजक अॅड. प्राजक्ताताई हरपळे, सोपान-काका काळे आदींचे हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमीटी आळंदी, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, पत्रकार संघ आदींसह अध्यापक महाराज यांचा समावेश असलेल्या ओळख श्री ज्ञानेश्वरीची एक परिवार आणि राज्यातील विविध शाळांच्या माध्यमातून शालेय मुले शिक्षण घेत असतानाच त्यांना शैक्षणिक आणि अध्यात्मिक बैठक लाभावी यासाठी संत साहित्यातून व्यक्तिमत्व विकास, शालेय जीवनात मूल्य शिक्षण आणि संत साहित्याचे सहकार्याने मुले सुशिक्षित, सुसंस्कारित तसेच सुसंस्कृत घडावी यासाठी ओळख श्री ज्ञानेश्वरीची एक परिवार गेल्या पाच वर्षांपासून उपक्रम सुरु झाला.
या माध्यमातून सुमारे १०२ वर शाळांत हा उपक्रम सुरु आहे. याच उपक्रमाचा भाग उपक्रमातील सहभागी प्रशाला येथील मुलांसाठी दुसऱ्या पर्वातील उपक्रमाचा प्रारंभ हरिनाम गजरात सुरु करण्यात आला. यात मागील उपक्रमातील सहभागी मुलांसाठी पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात झाला.
विद्यार्थ्यांचे मुल्य संवर्धनासाठी सुरू असलेला हा संस्कारक्षम उपक्रम आळंदी तिर्थक्षेत्राचे कुशीत वसलेले धानोरे गावच्या या आदर्श शाळेत संपन्न झाला या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा म्हणून राज्य स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला आहे.या प्रशालेस रोख रक्कम एक्कावन लाख रुपयांचे बक्षीस स्वरूपात मुख्यमंत्री माझी शाळा उपक्रमात प्रदान करण्यात आले आहे.
अशा या लौकिक प्राप्त प्रशालेत देखील हा उपक्रम राबविला जात असल्याने या उपक्रमाचे हि कौतुक करण्यात आले. पुणे जिल्हा परिषद आदर्श शाळेत ओळख श्री ज्ञानेश्वरीची एक परिवार अंतर्गत घेण्यात आलेल्या संस्कारक्षम उपक्रमा अंतर्गत परिक्षेत उतीर्ण विद्यार्थी मुलांना भव्य पारितोषिके प्रदान प्रसंगी तुकाराम महाराज ताजने, विश्वकर्मा महाराज पांचाळ, अर्जुन मेदनकर, प्राजक्ता हरपळे, सत्यवान लोखंडे आदींनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग आव्हाड यांनी केले, तर उपस्थित मान्यवरांचे आभार मुकुंद गावडे यांनी मानले. पसायदान गायनाने मंगलमय उत्साही वातावरण कार्यक्रमाची सांगता झाली.