PCMC : "एक पाऊल समाजसेवेकडे – नागरिकांच्या सोयीसाठी!"

 


पिंपरी चिंचवड : वृक्षमित्र अरुण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी विशेष उपक्रम 

 मोफत स्मार्ट कार्ड सेवा - आता तुमच्या साठी ! वाढदिवस विशेष म्हणून वृक्षमित्र अरुण पवार यांच्या संकल्पनेतून नागरिकांसाठी मोफत सेवा सुरू करण्यात आली आहे.

 मतदान कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, आधार कार्ड  यांचे स्मार्ट कार्ड मोफत करून देण्यात येणार, आहे. योजनेचा शुभारंभ आज योगशिक्षक, एक्टरेस, चित्रपट, धुमस, दिल बेधुंद, फांजर, अनेक सिरीयल, माझी विठू माऊली, माझी रेणुका माऊली, क्राइम पेट्रोल, लय भारी कारभारी, शॉर्ट फिल्म धाडस  अभिनेत्री साक्षी चौधरी, गुरुवर्य माऊली योगा टीचर खैरनार व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. 




या वेळी त्यांचा श्री ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा ग्रंथ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला, ही एक अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला जोडणारी भावना होती."यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

ही मोफत सेवा आजपासून ते 13 ऑगस्ट 2025 पर्यंत दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत उपलब्ध आहे.आपले कागदपत्र घेऊन वेळेत या आणि या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वृक्षमित्र अरुण पवार यांनी केले आहे.


थोडे नवीन जरा जुने