पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून आज पावना धरण परिसरात पवना माईचे जलपूजन करण्यात आले. धरण आता 90 टक्के भरलेले आहे मे महिन्यापासून पाऊस अतिशय चांगल्या सुस्थितीत आहे त्यामुळे मावळ परिसरात देखील सगळीकडे हिरवळ दाटली आहे पाण्याचा प्रश्न त्यांचा देखील सुटलेला आहे. परंतु पिंपरी चिंचवडकर यांचा पाण्याचा प्रश्न मात्र अजूनही सुटलेला नाही
धरण उशाला आणि कोरड आमच्या घशाला अशी स्थिती पिंपरी चिंचवडकरांची झाली आहे. काही मान्यवरांनी निवडणुकीच्या वेळी आश्वासन दिले होते आम्हाला सत्ता द्या, आम्ही तुमचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावू. तुम्हाला रोज पाणी मिळेल. परंतु आता सत्तेत बसून कितीतरी महिने झाले, तरीदेखील पिंपरी चिंचवड करांना पाण्यासाठी वाट पाहावी लागत आहे.
वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शहराला पाच आमदार आहेत पण पाणी प्रश्नावर कोणतेही आमदार बोलायला तयार नाहीत त्यामुळे शहराला नियमित पाणीपुरवठा व्हावा दररोज सकाळीच पाणी मिळावे संध्याकाळचे पाणी बंद करावे यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी प्रयत्न करणार आहोत याप्रसंगी राष्ट्रवादी शरद चंद्रपवार पक्षाच्या महिला अध्यक्ष ज्योती ताई निंबाळकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्षाच्या रूपाली आल्हाट, प्रदेश सरचिटणीस माजी नगरसेविका प्रियांका बारसे, शहर समन्वयक जयमाला कदम, तायरा सय्यद, अर्चना बारकुल, कल्पना घाडगे, कमल धाईंजे, सोनल पासलकर, पुष्पा गोपाळे, राणी थोरात, शहर उपाध्यक्ष विनोद धुमाळ, सचिन निंबाळकर,संतोष म्हात्रे, पुणे जिल्हा समन्वयक युवा सेना गौतम लहाने, युवा सेना उपशहर प्रमुख हे पदाधिकारी उपस्थित होते.