कामगार नेते जीवन येळवंडे यांची मोई (ता खेड)येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्ष पदी निवड


चिंबळी - मोई (ता. खेड)येथील  विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्ष पदी जीवन येळवंडे व उपाध्यक्ष पदी मनिषा गवारी यांची बिनविरोध निवड झाल्याचे संस्थेचे सचिव निलेश देशमुख यांनी सांगितले 

मोई येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या इतर संचालकांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गवारी व उपाध्यक्षा सुरेखा करपे यांनी ठरल्या प्रमाणे राजीनामा दिला असल्याने या रिक्त जागेसाठी चाकण येथील संस्थेच्या कार्यालयात  निवडणूक निर्णय अधिकारी एम पी राऊत यांच्या अध्यक्षतेखालील घेण्यात आलेल्या अध्यक्ष पदासाठी जीवन येळवंडे व उपाध्यक्ष पदासाठी मनिषा गवारी यांचे सर्वानुमते अर्ज दाखल करण्यात आले.

अध्यक्षपदी जीवन येळवंडे व उपाध्यक्षपदी मनिषा गवारी यांची बिनविरोध निवड झाल्याचे एम पी राऊत यांनी घोषित केले यावेळी संस्थेचे संचालक भगवान साकोरे समीर गवारी संभाजी करपे ज्ञानेश्वर गवारी उपाध्यक्षा सुरेखा करपे जालिंदर गवारी रवींद्र गवारी कानिफनाथ गवारी गोरख फलके चेतन गवारी आदि मान्यवर उपस्थित होते. 

नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सर्व संचालकांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सर्व संचालक व आजी माजी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व समस्त उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने