मोठी बातमी : जुन्नरजवळ मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू, जरांगे यांनी फडणवीसांना धरले जबाबदार

Maratha protester dies of heart attack near Junnar, Jarange holds Fadnavis responsible


मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो आंदोलक अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघाले असताना, जुन्नरजवळ एका आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मृत आंदोलकाचे नाव सतीश देशमुख असून, ते बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील वरदगावचे रहिवासी होते. या घटनेमुळे संपूर्ण मराठा समाजात शोककळा पसरली असून, आंदोलनकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

ही दुर्दैवी घटना जुन्नर येथे घडली. आंदोलनकर्ते मुंबईकडे जात असताना सतीश देशमुख यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मनोज जरांगे पाटील यांनी या घटनेची माहिती मिळताच दुःख व्यक्त केले आणि म्हणाले, "मला आता माहिती कळाली की आमचा देशमुख नावाचा बांधव प्रवासात असताना त्यांचा दम छाटला आणि त्यांना अटॅक आला. मी याबाबत अजूनही माहिती घेत आहे. परंतु ही घटना अत्यंत दुःखद आहे."

जरांगे पाटील यांनी या मृत्यूला 'बलिदान' म्हटले आहे. ते म्हणाले, "सतीश भैय्याचं आताच बलिदान गेलंय. हे बलिदान वाया जाऊ द्यायचं नाही. त्यामुळे आपण संयमाने आंदोलनाची लढाई लढू. आपण टप्प्याटप्प्याने आरक्षण घेऊ." त्यांनी या घटनेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले आणि म्हणाले, "याला जबाबदार फडणवीस साहेब आहेत.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. बुधवारी (२७ ऑगस्ट) हजारो आंदोलकांसह अंतरवाली सराटी (जालना) येथून हे मोर्चा सुरू झाला. पहिला थांबा जुन्नर येथे होता, जिथून ते शिवनेरीकडे निघाले आणि नंतर मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत.

Maratha-protester-dies-of-heart-attack-near-Junnar-Jarange-holds-Fadnavis-responsible

थोडे नवीन जरा जुने