मनोज जरांगे पाटील शिवनेरी किल्ल्यावर नतमस्तक ; म्हणाले तुम्हाला शब्द देतो…

Manoj Jarange Patil, who led a march for Maratha reservation, bowed at Shivneri Fort


मुंबई : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांनी काल (२७ ऑगस्ट) जालन्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने मोर्चा सुरू केला. आज सकाळी ते पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर पोहोचले, जिथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतले आणि मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांचा मोर्चा काल अंतरवाली सराटीतून निघाला आणि रात्रभर प्रवास करून आज सकाळी जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचला. किल्ल्यावर जाण्यापूर्वी ते पहिल्या पायरीवर नतमस्तक झाले, मातीचा टिळा कपाळी लावला आणि शिवाई देवीचे दर्शन घेतले. या वेळी समर्थकांनी जेसीबीतून पुष्पवृष्टी केली आणि 'एक मराठा, कोटी मराठा'च्या घोषणा दिल्या. जरांगे पाटील म्हणाले, "सरकार छत्रपतींच्या विचारांचं असेल तर... मी शिवनेरी किल्ल्यावरून तुम्हाला शब्द देतो, आरक्षण दिले तर कधीच विसरणार नाही."

मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळावे ही मुख्य मागणी आहे. २७ ऑगस्टला गणेश चतुर्थीच्या दिवशी मोर्चा सुरू झाला आणि २८ ऑगस्टला शिवनेरीवर थांबा घेण्यात आला. यानंतर मोर्चा राजगुरूनगर, चाकण, लोणावळा, वाशी आणि चेंबूर मार्गे मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचेल. मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर ५,००० लोकांसाठी परवानगी दिली आहे, पण जरांगे पाटील यांनी याला विरोध दर्शवला असून, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहील असे म्हटले आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात जुन्नरजवळ एका आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मृत आंदोलकाचे नाव सतीश देशमुख असून, ते बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील वरदगावचे रहिवासी होते. या घटनेमुळे संपूर्ण मराठा समाजात शोककळा पसरली असून, आंदोलनकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Maratha-reservation-leder-Manoj-Jarange-Patil-bowed-at-Shivneri-Fort

थोडे नवीन जरा जुने