पिंपरी चिंचवड - गौरी- गणपती आगमन होत आहे,अनेक गणपती दीड दिवसाचे विसर्जन असतात व त्यानंतर गौरी व बाकी गणपती विसर्जन होतात.
महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे प्रत्येक वर्षी केशवनगर, चिंचवड मधील गणेश विसर्जन घाटाची पाहणी करीत असतात व सर्व नियोजन बघून काही त्रुटी असेल तर प्रशासनास पाठपुरावा करून भाविकांना जास्तीत जास्त चांगल्या सोयी देण्याचा प्रयत्न असतो.
या वर्षी सुद्धा गणेश विसर्जन घाटाची पाहणी केली या ठिकाणी गणेश विसर्जन पूर्वी चौथऱ्यावर ठेऊन आरती करून गणेश विसर्जन केले जाते परंतु गेल्या वर्षी आरती साठी योग्य चौथरा नव्हता त्यामुळे गणेश भक्तांची खूप निराशा झाली होती. रस्त्यावर उभे राहून तर काहींनी आजूबाजूला कठड्याचा सहारा घेतला होता. गेल्या वर्षी या घाटावर दोन चौथरे बांधले आहेत ते दक्षिण उत्तर असे चुकीच्या पद्धतीने बांधले आहेत.
पण गणेशभक्त आरती पूर्व पश्चिम दिशा करतात ही बाब संबधीत पालिका आधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली होती पण वेळ कमी आहे, कारण सांगून वेळ मारून नेली होती तर या वर्षी तिच अवस्था आहे.
महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांच्या वतीने मागणी व आवाहन करीत आहे की, या घाटावर तीन चौथरे त्वरित बांधावेत किंवा पाच टेबलची तात्पुरती व्यवस्था करावी गणेश भक्तांच्या भावनेशी खेळू नये असे आवाहन मनपा प्रशासनास करीत आहोत, असे मधुकर बच्चे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
![]() |