पिंपरी चिंचवड - गेल्या वीस वर्षांपासून विठ्ठल (नाना) कृष्णाजी काटे हे राजकारणात सक्रिय आहेत. २००७ सालापासून महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत आहे. त्याही आधीपासून रहाटणी- पिंपळे सौदागर या परिसरासह संपूर्ण चिंचवड शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन ते करत होते.
महानगरपालिकेत सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून कार्यरत. आरक्षण पडल्याने २०१२ साली झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत नाना काटे यांच्या पत्नी शितल विठ्ठल काटे यांना पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सर्वाधिक मताधिक्याने येथील जनतेने निवडून दिले होते.
नाना काटे हे वारकरी संप्रदायाशी निगडित असल्याने त्यांना मानणारा मोठा वर्ग चिंचवड शहरात आहे. २०१४ साली त्यांनी चिंचवड विधानसभा निवडणूक लढविली आहे. "चिंचवड शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक अशा प्रत्येक क्षेत्रात योगदान देण्याचा पूर्ण प्रयत्न आजवर केला आहे. नेहमीच विकासाला केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचा प्रयत्न राहिला आहे. गेली वीस वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे" असं काटे सांगतात.
नाना काटे हे सुरुवातीपासून राष्ट्रवादीत आहेत. तसेच जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच नाना काटे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. चिंचवड मतदारसंघात निवडून येणारच असे नाना काटे यांचे व्यक्तिमत्व आहे, इतकी त्यांची लोकप्रियता अफाट आहे
शहरातील सर्वात तरुण युवा नेता अशी त्यांची ख्याती आहे. चिंचवड विधान सभा मतदार संघात लोकप्रिय नेतृत्व, तरुणाईचे आधार स्तंभ आणि सतत कार्यरत असलेले नाना काटे यांना लहान थोरापासून सर्वांचे लाडके नेते आहेत. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. त्यांना भावी आयुष्यात राजकीय आणि सामाजिक शुभेच्छा व्यक्त करत आहोत.