PCMC : "अभिराज फाउंडेशन "मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.


 पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - वाकड येथील"अभिराज फाउंडेशन " या दिव्यांग मुलांच्या शाळे मध्ये 15 ऑगस्ट 2025 रोजी 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वुई टूगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे, लायन्स क्लब ऑफ रहाटणी पुणेचे डायरेक्टर लायन अशोक बनसोडे, अभिराज फाउंडेशनचे डायरेक्टर रमेश मुसूडगे, पालक संघ सदस्य सिद्धार्थ उघाडे सर, वुई टूगेदर फाउंडेशनचे सचिव जयंत कुलकर्णी, सलीम सय्यद, धनंजय मांडके, सौ गोळे पालक संघाचे सदस्य धनंजय  बालवडकर मुख्याध्यापिका अनिता चव्हाण, पालक, विद्यार्थी, शिक्षक, दादा, मावशी उपस्थित होते.

 मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीत व ध्वजगीत झाले.संतोष कोळी या विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हटली शाळेच्या विद्यार्थ्यांनी यंग ऍथलिक कार्यक्रम सादर केला. यासाठी मुलांना क्रीडा शिक्षक विकास जगताप ऋषीकेश मुसूडगे, योगेश दादा याचे मार्गदर्शन मिळाले. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते कुणाल, गोपी, मयूर,भरत, रविकांत या दादांचा सत्कार करण्यात आला.


त्यानंतर प्रमुख पाहुणे मधुकर बच्चे,  श्री बनसोडे  आणि सौ गोळे  यांनी  मार्गदर्शन पर भाषणामध्ये विद्यार्थ्यांचे व शिक्षकाचे कौतुक केले व स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 सूत्रसंचालन स्मिता हांडे यांनी केले पाहुण्यांची ओळख  वैशाली खेडेकर यांनी करून दिली.

 सौ वंजारी यांनी आभार प्रदर्शन केले. त्यानंतर खाऊ वाटप करण्यात आला अशाप्रकारे अभिराज फाउंडेशन या दिव्यांग मुलांच्या शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्ती च्या वातावरणात साजरा झाला.

थोडे नवीन जरा जुने