पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - मला अभिमान आहे की या नव्या क्लबची मी क्लब ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.
याच क्लबचा पहिला भव्य सोहळा – इन्स्टॉलेशन, इनोग्रेशन व इंडक्शन कार्यक्रम – अत्यंत उत्साहात पार पडला.
लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्टार्सचे पदाधिकारी
अध्यक्षपदी – लायन विद्या वकारे
सेक्रेटरी पदी – डॉ. लायन शितल मोरे
ट्रेझरर पदी – डॉ. लायन प्रज्ञा देवकाते त्यांची नियुक्ती झाली.
लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्टार्स व न्यू ओमेगा लिओ क्लब ऑफ SBIIMS यांचा इन्स्टॉलेशन, इनोग्रेशन व इंडक्शन प्रोग्राम – प्रारंभ हा सोहळा भव्यदिव्य वातावरणात पार पडला.
लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्टार्सचे इनॉगरेशन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2025-26 MJF लायन राजेश अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
न्यू ओमेगा लिओ क्लबचे लोकेशन इनॉगरेशन MJF लायन गिरीश मालपाणी यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाचे इन्स्टॉलिंग ऑफिसर MJF लायन सुनिता मालपाणी यांनी अत्यंत आकर्षक व नवीन पद्धतीने सर्व सदस्यांचे इन्स्टॉलेशन केले.
इंडक्शन ऑफिसर MJF लायन श्रेयश दीक्षित यांनी प्रभावी इंडक्शन करून सर्वांचे मन जिंकले.
मुख्य पाहुणे 5D MJF लायन गिरीश मालपाणी व PDG MJF लायन राज मुछाल यांनी उपस्थितांना सेवा कार्यासाठी मौल्यवान मार्गदर्शन केले.
लायन राज मुछाल यांनी आपल्या समृद्ध अनुभवातून लायन्स चळवळीचे महत्त्व, समाजसेवेतील भूमिका आणि कार्यसंस्कृती यावर सखोल मार्गदर्शन केले.
लायन गिरीश मालपाणी यांनी नवीन पिढीला लायन्समध्ये सक्रीय सहभागी होण्यासाठी प्रेरणा दिली आणि सेवा कार्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा याबाबत उत्तम विचार मांडले.
लायन विद्या वकारे यांची गौरवपूर्ण अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आमच्या क्लबच्या अध्यक्षपदी लायन विद्या वकारे यांची नियुक्ती झाल्याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे. इन्स्टॉलेशनच्या दिवशी त्यांनी केलेली सक्रियता आणि पुढाकार खूपच प्रेरणादायी ठरला. त्यांनी एका गरजू महिलेला शिलाई मशीन दिली असून, इन्स्टॉलेशनमध्ये सक्रियपणे सपोर्टही केले. या उपक्रमाद्वारे त्यांनी सामाजिक सेवा आणि गरजू लोकांसाठी मदतीचा उत्कृष्ट संदेश दिला आहे. आतापर्यंत त्यांनी चार महत्त्वाच्या आणि उपयुक्त ऍक्टिव्हिटीज यशस्वीरीत्या पूर्ण केल्या असून, पुढील काळातही त्या क्लबसाठी मोठ्या प्रमाणात नेटवर्किंग आणि विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार करत आहेत. आमच्या प्रेसिडेंट लायन विद्या वकारे यांनी अनेक अॅक्टिविटींचे नीटनेटके प्लॅनिंग केले आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली क्लब नक्कीच नव्या उंचीवर पोहोचेल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.
क्लब पदाधिकारी नियुक्ती
अध्यक्षपदी – लायन विद्या वकारे, सेक्रेटरीपदी – डॉ. लायन शितल मोरे, ट्रेझररपदी – डॉ. लायन प्रज्ञा देवकाते, क्लब ऍडमिनिस्ट्रेटर – लायन प्रीती बोंडे (तसेच, इन्स्टॉलेशन कमिटीची चेअर पर्सनची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे पार पाडली)
तसेच Joint Treasurer – लायन वैशाली वाकचौरे, Joint Secretary – लायन जितेश वकारे, GMT – लायन प्रीती बोंडे, GST – लायन अशोक अग्रवाल, PRO – लायन जयंत बोंडे.
बोर्ड ऑफ डायरेक्टर्स
लायन नरेंद्र अग्रवाल
लायन अमोल तुरखडे
लायन प्रीती बोंडे
लायन जयंत बोंडे
लायन अशोक अग्रवाल
उपस्थित सभासद आणि पदाधिकारी यांचे आभार
ZC मुकुंद आवटे – आपले पण मनापासून आभार!
लायन प्रीती दीक्षित, लायन पल्लवी देशमुख, लायन धनंजय धुमाळ, लायन रवींद्र सातपुते, लायन प्रेसिडेंट सिद्धार्थ टंडन सर – आपले मनापासून आभार!
लायन धनंजय धुमाळ सर यांचे विशेष आभार – आपण या क्लबचे प्रारंभ करण्यासाठी आम्हाला जो पाठिंबा दिला, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. लिओ ओमेगा क्लब व लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्टार स्थापन करण्यासाठी आपला शंभर टक्के वाटा होता आणि आपण दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही ऋणी आहोत.
लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्टारचे सर्व सभासद, इतर लायन्स क्लबचे पदाधिकारी, कॅबिनेट मेंबर्स – ह्या सोहळ्यात आपला मनपूर्वक सहभाग होता. आपण शब्दाला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही ऋणी आहोत.
कमिटी मेंबर्सचे कौतुक
आमच्या क्लबच्या सर्व कमिटी मेंबर्सनी खूप छान मेहनत घेतली आणि कार्यक्रम यशस्वी केला. या मेहनतीबद्दल आणि सहकार्याबद्दल मी, लायन प्रीती बोंडे – क्लब ऍडमिनिस्ट्रेटर, आमच्या लायन्स क्लब पिंपरी चिंचवड स्टारच्या कमिटीमधील सर्व सभासदांचे मनापासून आभार व्यक्त करते.
लायन प्रीती बोंडे,क्लब ऍडमिनिस्ट्रेटर,लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्टार्स