अचानक तरुणाच्या बँक खात्यात आले 100 कोटी ; त्याने काय केले वाचा !

100 crores deposited in Deepak's bank account in Greater Noida, Uttar Pradesh

Kotak Mahindra Bank Deepak Noida : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील 20 वर्षीय तरुण दीपकच्या बँक खात्यात अचानक 1,13,55,00,00,000 रुपये (जवळपास 1 अब्ज 13 लाख कोटी रुपये) जमा झाल्याची धक्कादायक घटना 3 ऑगस्ट 2025 रोजी समोर आली. ही रक्कम दीपकच्या नावे असलेल्या कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यात दिसून आली. या प्रकरणाने स्थानिक प्रशासन, बँक आणि आयकर विभागाला चक्रावून सोडले आहे.

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील ऊंची दनकौर गावात दीपक राहतो, तो आपल्या मोबाईल बँकिंग अॅपद्वारे खाते तपासत असताना त्याला ही अवास्तव रक्कम दिसली. खात्यात 36 अंकी रक्कम (10,01,35,60,00,00,00,00,01,00,23,56,00,00,00,00,299 रुपये) जमा झाल्याचा संदेश त्याला मिळाला. ही रक्कम इतकी प्रचंड होती की, ती पाहून दीपक आणि त्याचे कुटुंबीय अवाक् झाले. काही क्षणांसाठी दीपक जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनला.

दीपकने तातडीने ही बाब आपल्या मामाला आणि कुटूंबीयांना सांगितली. त्यानंतर दीपकने त्यातील 10 हजार काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला कोणतेही पैसे काढता आले नाही. नंतर त्याने बँकेशी संपर्क साधला. बँक कर्मचाऱ्यांना हा प्रकार संगितल्या आकडा पाहुन बँक कर्मचारीही चक्रावून गेले.

प्राथमिक तपासात ही रक्कम बँकेच्या मुख्य सिस्टममध्ये नोंदलेली नसल्याचे आढळले, परंतु दीपकच्या मोबाईल अॅपवर ती दिसत होती. बँक अधिकाऱ्यांनी याला तांत्रिक चूक असल्याचे सांगितले. तसेच दीपकचे बँक खाते तात्पुरते गोठवण्यात आले.

सोशल मीडियावर जोरदार चर्चा

या घटनेने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. काही नेटकऱ्यांनी मजेशीर टिप्पणी केली की, "दीपक आता मुकेश अंबानींपेक्षा श्रीमंत झाला आहे," तर काहींनी ही रक्कम शाहरुख खानच्या एकूण संपत्तीपेक्षा 15,000 पटीने जास्त असल्याचे म्हटले. या घटनेने बँकिंग सिस्टममधील तांत्रिक त्रुटी पुन्हा एकदा समोर आली आहे.

ही घटना उत्तर प्रदेशातील पहिलीच नाही. मे 2024 मध्ये, भदोही जिल्ह्यातील भानू प्रकाश याच्या किसान क्रेडिट कार्ड (KCC) खात्यात 99 अब्ज 99 कोटी रुपये जमा झाल्याची घटना घडली होती. त्या वेळीही बँकेने याला सॉफ्टवेअरमधील त्रुटी ठरवले होते, कारण खाते NPA (नॉन-परफॉर्मिंग असेट) झाल्यामुळे मायनस चिन्ह दिसत नव्हते.

100-crores-deposited-in-Deepak-bank-account-in-Greater-Noida-Uttar-Pradesh

थोडे नवीन जरा जुने