PCMC : रस्त्यावरील अपघाती झाडांची वेळेवर छाटणी करा - मधुकर बच्चे

 


पिंपरी चिंचवड : गौरी-गणपतीचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. तानाजीनगर, पोदार शाळा, श्री शिवाजी उदय मंडळ रोड, विवेक वसाहत, काकडे पार्क, केशवनगर ते गणेश विसर्जन घाट रोड या प्रमुख रस्त्यांवरून मोठ्या गणपती मूर्तींच्या मिरवणुका होतात.

मात्र, या रस्त्यांवर अनेक झाडांच्या फांद्या पूर्ण रस्त्यावर झुकलेल्या आहेत. त्यामुळे मोठ्या गाड्यांना गणपती घेऊन जाणे अवघड झाले आहे. याबाबत पालिकेच्या प्रशासनाला वारंवार सांगूनही वेळेत झाडांची छाटणी केली गेलेली नाही, ही बाब अत्यंत गंभीर आहे. दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही प्रशासन शेवटच्या क्षणी काही ठिकाणी केवळ तोंडदेखली छाटणी करून जबाबदारी झटकते, ही अत्यंत खेदजनक बाब आहे.


महावितरण समितीचे सदस्य मधुकर बच्चे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनेक वेळा सूचना दिल्या असूनही अद्याप काहीच कार्यवाही झाली नाही. परिणामी, गणपती मंडळांचे कार्यकर्ते व नागरिकांना फांद्या हातात बांबू घेऊन बाजूला करत मूर्ती नेताना खूप त्रास सहन करावा लागतो.

प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, आणि वेळेत छाटणी का झाली नाही, याची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अन्यथा, दोन दिवसांत छाटणी न झाल्यास मधुकर बच्चे यांच्या वतीने फांद्या स्वखर्चाने छाटून त्या थेट ‘ब’ प्रभाग कार्यालय व उद्यान विभागात आणून ठेवण्यात येतील, याची नोंद घ्यावी.




थोडे नवीन जरा जुने