PCMC : पालक आणि मुलांचा संगम – इको-फ्रेंडली गणपती बनवण्याची आगळीवेगळी स्पर्धा


पिंपरी चिंचवड : लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्टार्स यांच्या वतीने Kidzee Kumarparv स्कूल, मोशी येथे एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.

यामध्ये इको-फ्रेंडली गणपती बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये विशेषत्वाने पालक आणि मुलांनी एकत्र येऊन सहभाग नोंदवला.

या स्पर्धेचे आयोजन लायन प्रीती बोंडे यांनी केले होते. त्यांच्या पुढाकारामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

शाळेच्या संस्थापक शितल बोंडे मॅडम, राजश्री शिवले मॅडम तसेच तेजल माटे मॅडम यांनी या उपक्रमासाठी सहकार्य करून मुलांना व पालकांना सर्जनशीलता आणि कौटुंबिक एकात्मतेचा सुंदर अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून दिली.





या उपक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे –

#  मुलं आणि पालकांनी मिळून केलेली गणेशमूर्ती ही केवळ एक कला नव्हे, तर प्रेम, संस्कार आणि निसर्गाशी जपलेली नाळ ठरली.

# आजच्या धावपळीच्या जीवनात पालक व मुलांसाठी एकत्र आनंदाचे क्षण साजरे करण्याचे व्यासपीठ ठरले.

स्पर्धेत सहभागी सर्व मुलांना सर्टिफिकेट्स देण्यात आली.

President Ln Vidya Vakare, Secretary Ln Dr. Sheetal More, Treasurer Ln Dr. Pradnya Deokate तसेच Club Founder Ln Priti Bonde यांच्या हस्ते मुलांना प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक विजेत्यांना ट्रॉफी प्रदान करण्यात आली, तसेच काही विद्यार्थ्यांना मेडल्स व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.


उपस्थित मान्यवर :

Club Founder Ln Priti Bonde

President Ln Vidya Vakare

Secretary Ln Dr. Sheetal More

Treasurer Ln Dr. Pradnya Deokate

Ln Jayant Bonde

Ln Jitesh Vakare

Ln Dadarao Fate Sir

थोडे नवीन जरा जुने