पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) - सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पुणे यांच्यातर्फे समाजातील वंचित असलेला घटक म्हणजे अनाथ आश्रम मधील मुले आणि मुली यांना राखी बांधून एक अनोखे रक्षाबंधन साजरे करण्यात आले, चिखली येथील विकास अनाथ आश्रम येथे दिनांक ९ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 9.30 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात संस्थेच्या सर्वांनी मुलीं आणि मुलांना सुद्धा राखी बांधली ज्याने एक अनोखा संदेश समाजाला दिला आहे, आजच्या या धावपळीच्या युगात प्रत्येकांनी जबाबदारी घेऊन समाजातील वंचितांचे संरक्षण केले पाहिजे त्यासाठी हा उपक्रम अनोख्या पद्धतीने राबविण्यात आला.
सदर कार्यक्रम हा सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात, पुणे जिल्हा उपाध्यक्ष भगवान वायकर, पुणे जिल्हा सचिव विजय महाजन, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष महेंद्र शेळके, पिंपरी चिंचवड महिला शहर उपाध्यक्ष रसिका झांबरे, पिंपरी चिंचवड शहर सचिव विनायक जगताप,पिंपरी चिंचवड शहर सह सचिव मारुती तमवार, सदस्य आशिष कदम, दीपक पवार, वैभव हेंद्रे, सक्षम वायकर, मिसेस पवार, झांबरे साहेब आदी उपस्थित होते.
सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ ही संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवत असताना मानव अधिकार जनजागृती, समाजातील वंचित घटकांना मदत,अत्याचार विरोधी काम करणे, अन्यायाला वाचा फोडने,भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करणे आशा अनेक विषयांवर काम करत असते.
वंचित घटकांबरोबर रक्षाबंधन साजरा करणे ही संकल्पना सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे हे नेहमीच संस्थेला संभोधित करत असतात तर सदर कार्यक्रम हा राबविल्याबद्दल संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार आणि पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांनी पुणे टीम चे कौतुक केले.
अशा प्रकारचे विविध उपक्रम हे सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पुणे टीम कडून पुढील काळातही राबविले जाणार आहेत जसे की समाजातील चांगले काम करणाऱ्या सरकारी अधिकारी,कर्मचारी यांचा सन्मान करणे, वृक्षारोपण करणे असे पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात यांनी सांगितले.