पिंपरी चिंचवड - जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक कवी महासंघ व झुंजार लेखणी आयोजित महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या गौरवशाली ३०० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्यातुन विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्यरत असणार्या राष्ट्र विकासाच्या उन्नतीसाठी सामाजिक सेवा करणारे आदर्श रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समतावादी आणि मानवतावादी विचारांना आदर्श मानुन जीवनात कृती व्यवहार करत सामाजिक सलोखा जपणारे तसेच शैक्षणिक, आरोग्य, कला, क्रिडा, सिने, सांस्कृतिक, साहित्य, कृषी, पर्यावरण, पत्रकारिता, धार्मिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असल्यामुळे पिंपरी चिंचवडचे भुषण पैलवान काळुराम लांडगे यांची संस्थेने दखल घेऊन मुंबई येथे मराठी पत्रकार संघ , पत्रकार भवना मध्ये सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व शाल कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.आमदार अशोक धात्रक, भारत सरकार फिल्म सेंसॉर बोर्डाचे सदस्य विलास खानोलकर, होळकर घराण्यातील सुनबाई तसेच महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यक प्रकल्प अदिवासी अधिकारी विभागाच्या तेजस्वी गलांडे - होळकर यांच्या शुभहस्ते महाराणी अहिल्याबाई होळकर महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२५ बहाल करण्यात आला.
यावेळी अभिनेत्री व प्रसिद्ध मॉडेल जारा खान, प्रसिद्ध सौंदर्यतज्ञ स्वाती ओक, पोलिस मित्र व समाजभुषण दिलीप नारद, झुंजार लेखणीचे संपादक संतोष धुरंदर, शिवश्री व समाजसेवक विजय भोसले, तेजस्वीनी महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा संगीता शिंदे उपस्थित होते.
कार्यक्रमाला पुरस्कार्थी , नातेवाईक व नागरिकांनी भरपुर गर्दी केली होती
कार्यक्रम संपूर्ण पारपाडण्यासाठी जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखक कवी महासंघाचे सदस्य सुरज भोईर व त्यांच्या टीमने भरपुर प्रयत्न केले.