जुन्नर शहर कुरेश बिरादर यांच्या नवीन अध्यक्षांची घोषणा


जुन्नर (रफिक शेख) : जुन्नर शहरात कुरेश बिरादर यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आज संपन्न झाली. या बैठकीत कुरेश जमातच्या नवीन अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. हाजी अकील भाई कुरेशी यांची कुरेश जमातच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, तर हाजी शकील भाई यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. याशिवाय, सेक्रेटरी, खजिनदार आणि इतर सदस्यांच्या नावांचीही घोषणा करण्यात आली.



या बैठकीला जुन्नर शहरातील प्रमुख नेते आणि समाजातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये ऍड. जमीर भाई कागदी, माजी नगरसेवक फेरोज भाई पठाण, अमजद भाई कागदी, तौसिफ भाई, रऊफ खान साहेब, राजू भाई, जावेद सय्यद आणि जररार भाई यांचा समावेश होता. या सर्वांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सत्कार केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

कुरेश बिरादर आणि मुस्लिम समाजाच्या वतीने नवीन पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. या निवडीमुळे समाजाच्या विकासासाठी आणि एकतेसाठी नवीन दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष हाजी अकील भाई कुरेशी यांनी समाजाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प व्यक्त केला.

Announcement of-new-president-of-Junnar-city-Quresh-Biradar

थोडे नवीन जरा जुने