प्रसिद्ध गायक जुबिन गर्ग यांचे निधन ; 40,000 हून अधिक गाणी रेकॉर्ड

Famous-singer-Jubin-Garg-passes-away-recorded-more-than-40000-songs


Zubeen Garg Death : आसामचे लोकप्रिय गायक जुबिन गर्ग (५२) यांचे १९ सप्टेंबर रोजी सिंगापूरमधील एका दुखद अपघातात निधन झाले. 'या अली' सारख्या हिट गाण्याने बॉलीवुडमध्ये ओळख निर्माण केलेल्या या कलाकाराचे निधन संगीतजगतात शोककळा पसरली आहे. ते नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलसाठी सिंगापूरला गेले होते.

जुबिन गर्ग हे १९ सप्टेंबर रोजी सकाळी सिंगापूरमधील एका यॉट ट्रिपवर होते. नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलच्या सांस्कृतिक राजदूत म्हणून ते तिथे पोहोचले होते. परफॉर्मन्सला अवकाश असल्यामुळे जुबिननं थ्रील अनुभवण्यासाठी स्कूबा डायव्हिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्टनुसार, सिंगापूर पोलिसांनी त्यांना समुद्रातून वाचवले आणि सिंगापूर जनरल हॉस्पिटलच्या आयसीयूत दाखल केले. मात्र, दुपारी २:३० वाजता त्यांचा मृत्यू झाला.

जुबिन गर्ग: असमचा हृदयस्पर्शी आवाज

जुबिन गर्ग (खरे नाव: जुबिन बोर्थाकुर) यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९७२ रोजी मेघालयच्या तुरा येथे झाला. त्यांचे वडील असमचे प्रसिद्ध संगीतकार नरेश गर्ग होते. बालपणीच त्यांनी गायनाची सुरुवात केली आणि आईकडून प्राथमिक प्रशिक्षण घेतले. त्यांनी तबल्याची ११ वर्षे शिकले आणि गुरू रमणी राय यांच्याकडून असमिया लोकसंगीत शिकले. १९९२ मध्ये त्यांचे पहिले अल्बम 'अनामिका' रिलीज झाले, ज्याने असममध्ये धुमाकूळ घातला.

असममध्ये 'माया', 'गाणे की आणे' सारख्या गाण्यांनी ते 'असमचा किशोर कुमार' म्हणून ओळखले गेले. बॉलीवुडमध्ये २००६ च्या 'गँगस्टर' चित्रपटातील 'या अली'ने त्यांना राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली. 'दिल तू ही बता', 'जाने क्या चाहे मन' सारख्या हिट गाण्यांनी त्यांनी हिंदीसोबतच ४० हून अधिक भाषांमध्ये गायन केले. ते १२ वाद्यांचे वादन करत आणि चित्रपटसृष्टीतही सक्रिय होते – गायक, संगीतकार, अभिनेते, दिग्दर्शक आणि प्रॉड्युसर म्हणून. असमच्या सांस्कृतिक वारशाला जिवंत ठेवण्यासाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे.

Famous singer Jubin Garg passes away; recorded more than 40,000 songs
थोडे नवीन जरा जुने