वडिलांच्या अंत्यविधीच्या दुसऱ्या दिवशीच IAS अधिकारी पूरग्रस्तांच्या मदतीला

IAS officer Mainak Ghosh helps flood victims on the day after his father's funeral


धाराशिव : महाराष्ट्रातील धाराशिव (पूर्वीचे उस्मानाबाद) जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मैनाक घोष यांनी कर्तव्याच उत्तम उदाहरण दिले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. वडिलांच्या अकाली निधनानंतरही शोक व्यक्त न करता, त्यांनी अंत्यविधीच्या दुसऱ्याच दिवशी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फिल्डमध्ये उतरून काम केले.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा, कळंब तालुक्यांसह अनेक भागांत नद्या-ओढे अतिप्रवाही झाल्याने शेकडो गावे पूरग्रस्त झाली आहेत. सुमारे ५० हजारहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून, जिल्हा प्रशासनाने मदतकार्याला वेग दिला आहे. या संकटकाळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अन्नधान्य, वैद्यकीय मदत, निवारा आणि पाणीपुरवठा यांसारख्या सुविधा पोहोचवण्याचे मोठे आव्हान आहे.

मैनाक घोष हे आयएएस अधिकारी असून, जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय प्रमुख म्हणून ते शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या विभागांची जबाबदारी सांभाळतात. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेने पूरग्रस्तांसाठी विशेष मदत केंद्रे उभारली असून, २०० हून अधिक कर्मचारी आणि स्वयंसेवकांना तैनात केले आहे. घोष यांनी स्वतः पूरप्रवण भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधला, मदत वितरणाची पाहणी केली आणि सरकारी योजनांचा लाभ तात्काळ पोहोचवण्याचे निर्देश दिले.

२७ सप्टेंबर २०२५ रोजी मैनाक घोष यांच्या वडिलांचे अकाली निधन झाले. हे निधन कुटुंबासाठी मोठा धक्का होते, पण पूरग्रस्तांच्या संकटाकडे दुर्लक्ष करता येत नव्हते. अंत्यविधी २८ सप्टेंबरला पार पडला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजे २९ सप्टेंबरला घोष यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयात हजेरी दिली. त्यानंतर ते लगेचच पूरग्रस्त भागात रवाना झाले. कळंब आणि उमरगा तालुक्यांतील पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन त्यांनी अन्न, वैद्यकीय मदत पुरवत पाहणी केली.

दरम्यान, जिल्ह्यातील जनता पुरामध्ये बुडाली असताना, शेतकऱ्यांची पिकं नष्ट झाले असताना, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव या मात्र नवरात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नाचगाण्यात दंग असल्याचं दिसून आलं. यावरून यांच्यावर मोठी टीका झाली.

IAS officer Mainak Ghosh helps-flood-victims-on-day-after-his-father-funeral

थोडे नवीन जरा जुने