जुन्नर : आदिवासी विशेष पदभरतीसह विविध मागण्यांसाठी SFI, DYFI चा उलगुलान मोर्चा

Junnar: SFI, DYFI hold protest for various demands including special recruitment of tribal posts


जुन्नर : राज्यातील शिक्षण, रोजगार, आरोग्य, वाहतूक सुविधा तसेच आदिवासी समाजाच्या हक्कांच्या प्रश्नांवर तोफ डागत स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) व डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) यांच्या वतीने सोमवारी जुन्नर शहरात भव्य उलगुलान मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तालुक्यातील शेकडो विद्यार्थी व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

मोर्चाच्या माध्यमातून आदिवासींसाठी जाहीर करण्यात आलेल्या १२,५२० पदांची विशेष भरती तात्काळ सुरू करावी. राज्य शासनातील ५५,६८७ रिक्त पदे त्वरित भरून काढावीत. भरती प्रक्रियेत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात यावे. शिक्षण, रोजगार निर्मिती, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्था व पर्यटन स्थळांचा विकास या प्रश्नांवर ठोस पावले उचलावीत, आदी मागण्या करण्यात आल्या.

यावेळी राज्य सचिव मंडळ सदस्य नवनाथ मोरे, सहसचिव निशा साबळे, जिल्हा सचिव अक्षय घोडे, जिल्हा समिती सदस्य दीपक वालकोली, गणेश जानकर, तालुका अध्यक्ष साहिल जोशी, सचिव सुरज बांबळे, सहसचिव विनायक इरणक, कोषध्यक्ष अक्षय साबळे, सदस्य स्वामी गवारी, अंकिता मांडवे, संजना हिले या सोबतच DYFI चे जिल्हा समिती सदस्य विलास साबळे, तालुका अध्यक्ष कृष्णा दुधवडे, सचिव राजेंद्र शेळके, उपाध्यक्ष शिवाजी लोखंडे, दिलीप कोकणे सहसचिव स्वप्नील जाधव, सदस्य किरण दाते, मंगेश बोऱ्हाडे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यांसह तालुक्यातून अनेक विद्यार्थी, युवक यामध्ये सहभागी झाले होते.

Junnar: SFI, DYFI hold protest-for-various-demands-including-recruitment-of-tribal-posts

थोडे नवीन जरा जुने