Nepal Gen Z Protest : नेपाळ सरकारने फेसबुक, ट्विटर (एक्स), इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअॅपसह 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातील तरुणांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. 3 सप्टेंबर 2025 पासून लागू झालेल्या या बंदीविरोधात आज, 8 सप्टेंबर रोजी, काठमांडूमध्ये हजारो तरुणांनी रस्त्यावर उतरून संसद भवनासमोर तीव्र आंदोलन छेडले. या आंदोलनाला 'जेन-झेड क्रांती' असे नाव देण्यात आले आहे.
नेपाळ सरकारने 28 ऑगस्ट 2025 रोजी सर्व देशी आणि आंतरराष्ट्रीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सात दिवसांत माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयात नोंदणी करण्याचा अल्टिमेटम दिला होता. हा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या सप्टेंबर 2024 च्या आदेशावर आधारित होता, ज्यामध्ये सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नेपाळमध्ये नोंदणी करणे आणि स्थानिक कार्यालय स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले होते.
मात्र, फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम, ट्विटर (एक्स) आणि व्हॉट्सअॅपसारख्या प्रमुख कंपन्यांनी या मुदतीचे पालन केले नाही. परिणामी, 3 सप्टेंबरपासून या 26 प्लॅटफॉर्मवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. केवळ टिकटॉक, ज्याने नोव्हेंबर 2024 मध्ये नोंदणी केली होती, त्याला या बंदीतून सूट देण्यात आली आहे. या निर्णयामुळे तरुणांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली, आणि आज काठमांडूमध्ये हजारोंच्या संख्येने तरुण रस्त्यावर उतरले.
आंदोलकांनी संसद भवनाचा घेराव केला आणि काहींनी संसद परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर, पाण्याचा मारा आणि हवेत गोळीबार केला. काठमांडू जिल्हा प्रशासनाने न्यू बानेश्वर आणि आसपासच्या परिसरात रात्री 10 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या हिंसक चकमकीत 14 तरुणाचा मृत्यू झाला असून, किमान 80 जण जखमी झाल्याची माहिती आहे.
तरुणांचा रोष आणि मागण्या
आंदोलकांचे म्हणणे आहे की, सोशल मीडिया हे तरुणांसाठी केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर माहिती, शिक्षण आणि सामाजिक बदलासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. "आम्ही 21व्या शतकात आहोत, आणि सरकार आम्हाला डिजिटल युगातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे,"
डिजिटल अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका
सोशल मीडियावरील बंदीमुळे नेपाळमधील डिजिटल अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. नेपाळमधील सुमारे 1.2 कोटी सोशल मीडिया वापरकर्त्यांपैकी बहुतांश तरुण आहेत, जे ऑनलाइन व्यवसाय, डिजिटल मार्केटिंग आणि कंटेंट क्रिएशनवर अवलंबून आहेत. काठमांडू येथील डिजिटल मार्केटिंग एजन्सी चालवणाऱ्या स्मिता राई यांनी सांगितले, "आमच्या व्यवसायाचे 80% काम सोशल मीडियावर अवलंबून आहे. ही बंदी आम्हाला उद्ध्वस्त करेल."
Youth-protest-against-social-media-ban-in-Nepal-14-people-die