महिंद्रा ट्रॅक्टर्स आणि महाराष्ट्र शासन यांच्यात गडचिरोलीमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यासाठी भागीदारी

 


गडचिरोली : भारतातील क्रमांक १ चा ट्रॅक्टर ब्रँड महिंद्रा ट्रॅक्टर्स आणि महाराष्ट्र शासन यांच्यात गडचिरोली जिल्ह्यात कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यासाठी एक करार करण्यात आला आहे. हा करार मुंबई येथे महिंद्रा ट्रॅक्टर्स, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण विभाग (DVET) आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था (MSSDS) यांच्यात झाला असून, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.

हे कौशल्य विकास केंद्र ग्रामीण युवकांना उद्योगजगतातील आवश्यक कौशल्ये देण्यासाठी एक संयुक्त उपक्रम आहे. गडचिरोली सारख्या आदिवासी आणि दुर्गम भागात स्थानिक तरुणांना रोजगारक्षम बनवण्याचा आणि त्यांच्या उपजीविकेला चालना देण्याचा यामागचा उद्देश आहे. पंतप्रधान  नरेंद्र मोदी आणि  देवेंद्र फडणवीस यांचे कौशल्य विकासाचे ध्येय लक्षात घेता ही योजना त्यांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.

या कार्यक्रमात महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड च्या फार्म इक्विपमेंट बिझनेसचे अध्यक्ष  वीजय नाक्रा म्हणाले, “महाराष्ट्र हा एक औद्योगिकदृष्ट्या पुढारलेला राज्य आहे, आणि शेती क्षेत्राशीही त्याचा खोल संबंध आहे. गडचिरोली येथील ग्रामीण युवकांसाठी कौशल्य विकासासाठी महाराष्ट्र शासनासोबत भागीदारी करताना आम्हाला अभिमान वाटतो. या उपक्रमातून ग्रामीण भागात समृद्धी आणण्याचा आमचा उद्देश आहे.”

गडचिरोलीतील या ट्रॅक्टर कौशल्य विकास केंद्रामार्फत महिंद्रा ट्रॅक्टर्स ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रसामग्री क्षेत्रातील आपले विशेष कौशल्य, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण प्रणाली वापरून युवकांना प्रशिक्षित करणार आहे. यामुळे उत्पादन केंद्रांमध्ये असेंब्ली कामे, तसेच डीलरशिप पातळीवरील विक्री व सेवाक्षेत्रातही करिअरच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या केंद्रात एक संरचित अभ्यासक्रम, प्रगत तांत्रिक उपकरणे, आणि अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे, जेणेकरून विद्यार्थी उद्योगासाठी तयार होतील.

महिंद्रा ट्रॅक्टर्सविषयी थोडक्यात माहिती:

महिंद्रा ट्रॅक्टर्स हे भारतातील क्रमांक १ ट्रॅक्टर ब्रँड असून मागील चार दशकांपासून विक्रमी ट्रॅक्टर उत्पादन करत आहेत.

1963 मध्ये International Harvester Inc., USA यांच्यासोबतच्या संयुक्त उपक्रमातून पहिला ट्रॅक्टर तयार झाला.

Deming Award आणि Japanese Quality Medal मिळवणारा एकमेव ट्रॅक्टर ब्रँड.

मार्च 2024 मध्ये 4 दशलक्ष ट्रॅक्टर्स विक्रीचा टप्पा ओलांडणारी भारतातील पहिली ट्रॅक्टर कंपनी.

भारतासह 50 हून अधिक देशांमध्ये उपस्थिती, आणि उत्तर अमेरिका, ब्राझील, फिनलंड, तुर्की, आणि जपानमध्ये उत्पादन सुविधा.

300 हून अधिक मॉडेल्स, विस्तृत पोर्टफोलिओ.

भारतात सर्वात मोठे विक्री, सेवा व सुटे भागांचे नेटवर्क.

ही भागीदारी गडचिरोलीसारख्या भागातील युवकांना नवसंजीवनी देईल व त्यांच्यासाठी नवे रोजगाराचे दरवाजे उघडेल.


थोडे नवीन जरा जुने