पिंपरी-चिंचवड | दिनांक – १८ सप्टेंबर २०२५ रोजी पुणे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे जिल्हाध्यक्ष किशोर अण्णासाहेब थोरात यांनी पुन्हा एकदा मानवतेचा आदर्श समोर ठेवला.
१८ सप्टेंबर रोजी थोरात यांचे मित्र क्रिशांत यांचा फोन आला. भोसरीतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये क्रिशांत यांच्या नातेवाईकावर उपचार सुरू होते आणि तातडीने A- नेगेटिव्ह रक्ताची गरज निर्माण झाली होती. ही माहिती मिळताच थोरात यांनी लगेच "दहा मिनिटं द्या, मी बघतो" असं आश्वासन दिलं.
काही वेळातच त्यांनी लाईफलाईन ब्लड बँक, सोमाटणे फाटा येथील संपर्क साधून रक्ताची उपलब्धता सुनिश्चित केली. अवघ्या एका तासात आवश्यक रक्त हॉस्पिटलमध्ये पोहोचवून रुग्णाला वेळेवर मदत मिळवून देण्यात आली.
या तात्काळ मदतीबद्दल रुग्णाचे कुटुंबीयांनी किशोर थोरात यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी अशा वेळेस धावून येणाऱ्या संघटनेचे कौतुक करत समाजसेवेच्या महत्त्वावर भर दिला.
याआधी देखील, १ मार्च २०२५ रोजी चिखली पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हाच उपक्रम आज एका गरजू रुग्णाच्या मदतीला आला, हीच सामाजिक कार्याची खरी ताकद आहे.
"रक्तदान हे केवळ दान नाही, ती एक रुग्णसेवा आहे, जीव वाचवणारी ईश्वरसेवा आहे." – किशोर थोरात
ते पुढे म्हणाले की, "आपण जेव्हा समाजासाठी काही करतो, तेव्हा त्यातून मिळणारं समाधान अमूल्य असतं. समाजकार्य करत राहा, मदत करा – उद्या आपल्यालाही ती परत मिळेल."
यावेळी त्यांनी लाईफलाईन ब्लड बँक, सोमाटणे फाटा यांचे विशेष आभार मानले.