पिंपरी चिंचवड - लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड कॉर्पोरेट वतीने शिक्षक दिनानिमित्त मंगला डोळे -सपकाळे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चिंचवड येथील यशस्वी क्लासेस हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला.
लायन्स क्लबचे अध्यक्ष रवींद्र काळे, सेक्रेटरी अनिल गालिंदे, खजिनदार गजानन चिंचवडे, लायन्स क्लबचे अध्यक्ष रवींद्र काळे,सेक्रेटरी अनिल गालिंदे, खजिनदार गजानन चिंचवडे, वुई टुगेदर अध्यक्ष मधुकर बच्चे, उपाध्यक्षा सोनाली मन्हास,सचिव जयंत कुलकर्णी, खजिनदार दिलीप चक्रे, पुरुषोत्तम डबीर, मोहन लोंढे, लायन वासंती रवींद्र काळे, शंकर कुलकर्णी, अपर्णा शंकर कुलकर्णी, सोनाली मन्हास, दारासिंग मन्हास, दिलीप पेटकर, क्रांतीकुमार कडुलकर, अनिल पोरे, विलास गटने, अनिल शिंदे, जाकीर सय्यद, जावेद शेख, श्रीनिवास जोशी, दिनेश राजपूत, खुशाल दुसाने, के. रंगा राव, श्रावणी बच्चे, सदाशिव गुरव, हनीफ सय्यद, नंदकिशोर वाडेकर, नंदकुमार तोष्णीवाल, धनंजय मांडके, धनंजय मांडके, बाळासाहेब जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
वुई टुगेदर अध्यक्ष मधुकर बच्चे, उपाध्यक्षा सोनाली मन्हास, सचिव जयंत कुलकर्णी, खजिनदार दिलीप चक्रे, पुरुषोत्तम डबीर, मोहन लोंढे, वासंती काळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
लायन्स अध्यक्ष रवींद्र काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, या वेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले
सलीम सय्यद यांनी सूत्रसंचालन केले.
![]() |
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मंगला डोळे - सपकाळे यांनी आपण शिक्षण क्षेत्रात केलेला संघर्ष चड उतार तर सांगितलेच पण त्यांनी अनेक विद्यार्थी निःस्वार्थी सेवा म्हणून घडविले अनेकांना श्यक्य तेवढी मदत करून उच्च शिक्षणापर्यंत पोहचविले तर अनेक विद्यार्थी आता आपल्या पायावर उभे आहेत.
लहान वयात वडील छत्र हारविले असतानाही वडिलांचा सामाजिक कार्याचा वारसा तर जपलाच परंतु मामांनी अत्यन्त संस्कारीत सांभाळ करून पुढे निःस्वार्थी कार्य करण्यास बळ दिले त्यातूनच या आधीचे अनेक पुरस्कार व आत्ताचा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाला असे मंगला यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
लायन्स क्लबचे खजिनदार गजानन चिंचवडे यांनी आभार मानले.