पिंपरी चिंचवड –दुर्गा नगर, भोसरी रस्त्यावरील अंबिका पेट्रोल पंपासमोर गेल्या अनेक दिवसांपासून पाईपलाईन लिकेज सुरू असून मोठ्या प्रमाणावर पिण्याचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. या लिकेजमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून महत्त्वाचे नैसर्गिक साधन वाया जात आहे.
स्थानिक नागरिकांनी या समस्येकडे वारंवार लक्ष वेधले असले तरी अद्याप महानगरपालिकेकडून योग्य ती कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
तक्रारदार शिवानंद चौगुले (मो. ९८५००९९९२१) यांनी महानगरपालिकेकडे लेखी तक्रार करून पुढील मागण्या केल्या आहेत :
१. सदर पाईपलाईन लिकेज तात्काळ दुरुस्त करण्यात यावे.
२. पिण्याचे पाणी वाया जाणे थांबवावे.
३. भविष्यात अशा समस्या वेळेत ओळखून त्वरित तोडगा काढावा.
नागरिकांचे म्हणणे आहे की, “महानगरपालिकेने स्वतःहून अशा समस्या लक्षात घेऊन तत्काळ उपाययोजना करणे अपेक्षित आहे. अन्यथा करातून उभारलेल्या संसाधनांचा गैरवापर होतो आणि सर्वसामान्यांना यातून फटका बसतो.”
स्थानिक नागरिकांनी या गंभीर समस्येकडे तत्काळ लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.