मोठी बातमी : राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर

Reservation for the posts of presidents of 34 Zilla Parishads in the state announced


मुंबई (Reservation for 34 Zilla Parishad president) : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे. राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर केले आहे. यासंदर्भातील अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली असून, यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हानिहाय आरक्षण यादी

ठाणे -सर्वसाधारण (महिला)

पालघर - अनुसुसूचित जमाती

रायगड- सर्वसाधारण

रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

सिंधुदुर्ग - सर्वसाधारण

नाशिक -सर्वसाधारण

धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

नंदूरबार-अनुसूचित जमाती

जळगांव - सर्वसाधारण

अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)

पुणे -सर्वसाधारण

सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

सांगली - सर्वसाधारण (महिला)

सोलापूर - नागरिकांचा मागास प्रवर्ग

कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)

छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण

जालना - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

बीड -  अनुसूचित जाती (महिला)

हिंगोली -अनुसूचित जाती

नांदेड - नागरिकांचा मागास प्रवर्ग

धाराशिव - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

लातूर - सर्वसाधारण (महिला)

अमरावती - सर्वसाधारण (महिला)

अकोला - अनुसूचित जमाती (महिला)

परभणी - अनुसूचित जाती 

वाशिम अनुसूचित जमाती (महिला)

बुलढाणा -सर्वसाधारण

यवतमाळ सर्वसाधारण

नागपूर - नागरिकांचा मागास प्रवर्ग

वर्धा- अनुसूचित जाती

भंडारा - नागरिकांचा मागास प्रवर्ग

गोंदिया - सर्वसाधारण (महिला)

चंद्रपूर - अनुसूचित जाती (महिला)

गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचे काम सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. आता अध्यक्षपदाच्या आरक्षणाच्या घोषणेमुळे निवडणूक प्रक्रियेला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Reservation for the posts of presidents-of-34-Zilla-Parishad-in-state-announced

थोडे नवीन जरा जुने