सत्ताधाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धमकावू नये: माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो

Those in power should not threaten officers: Former Police Commissioner Julio Ribeiro


मुंबई : महाराष्ट्राचे माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी सत्ताधारी नेत्यांना अधिकाऱ्यांना धमकावण्याच्या वाढत्या प्रवृत्तीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सत्तेचा गैरवापर करून पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याच्या घटनांवर रिबेरो यांनी टीका केली आहे. त्यांनी पोलीस दलाच्या स्वायत्ततेचे महत्त्व अधोरेखित करत सत्ताधाऱ्यांना कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना धमकावण्यापासून परावृत्त होण्याचा सल्ला दिला आहे.

अलीकडेच सोलापूर येथे एका महिला पोलीस अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्र्यांकडून दबाव आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा संदर्भ देत रिबेरो यांनी सत्ताधाऱ्यांच्या अशा वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सोलापूर येथील या घटनेत, एका महिला पोलीस अधिकाऱ्याने अवैध कामांना आळा घालण्याचा प्रयत्न केला असता, तिला वरिष्ठ राजकीय नेत्याकडून फोनवर दबाव आल्याचा आरोप आहे. या अधिकाऱ्याने आपले कर्तव्य बजावण्यात दृढता दाखवली, परंतु अशा घटनांमुळे पोलीस दलाचे मनोधैर्य खचण्याची भीती रिबेरो यांनी व्यक्त केली आहे.

रिबेरो यांनी “पोलीस दलाला स्वायत्तता असणे आवश्यक आहे. सत्ताधारी नेत्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे चुकीचे आहे. यामुळे केवळ अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खचत नाही, तर कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणीही कमकुवत होते.”

कोण आहेत ज्युलिओ रिबेरो ?

ज्युलिओ रिबेरो, 1953 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी, यांनी 1982 ते 1985 या कालावधीत मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून काम केले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मुंबई पोलीस दलात सुधारणा आणि कठोर कारवाईसाठी नावलौकिक मिळवला. सध्या 92 वर्षांचे असलेले रिबेरो अजूनही सामाजिक आणि प्रशासकीय मुद्द्यांवर आपले स्पष्ट मत मांडत असतात.

Those in power should not threaten officers-Former-Police-Commissioner-Julio-Ribeiro

थोडे नवीन जरा जुने