गोदावरीकाठच्या गावांमध्ये अस्तित्व फाउंडेशनचा मदतीचा हात




अस्तित्व फाउंडेशनकडून पूरग्रस्त गावांना मदतीचा हात


पिंपरी चिंचवड - अस्तित्व फाउंडेशनच्या वतीने लोकवर्गणी आणि लोकसहभागाच्या माध्यमातून ता. पाथरी, जिल्हा परभणी मधील गोदावरी नदीकाठच्या पूरग्रस्त गावांमध्ये आवश्यक मदत पोहोचवण्यात आली.  

गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूर आला होता. अनेक कुटुंबांचे घर, शेती व दैनंदिन उपजीविकेचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर अस्तित्व फाउंडेशनने तात्काळ मदतीचा उपक्रम हाती घेतला.  


या उपक्रमांतर्गत खालील गावांना मदत पोहोचवण्यात आली –  

▪ बाभूळगाव फाटा  

▪ लोनी  

▪ गुंज  

▪ गौंडगाव  

▪ उमारा  

या गावांमध्ये २५० रेशन किट, कपडे, तसेच शालेय उपयोगी वस्तू यांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक किटमध्ये तांदूळ,पीठ, डाळ, तेल, साखर,रवा, साबण व अन्य दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश होता. विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य देण्यात आले.  




लोकवर्गणी आणि लोकसहभागातून जमा झालेल्या निधीच्या आधारे ही संपूर्ण मदतकार्य योजना राबविण्यात आली. सर्व साहित्याचे पॅकिंग, वाहतूक आणि वितरण हे कार्य स्वयंसेवकांनी श्रमदानातून पूर्ण केले.  

मदतकार्याच्या वेळी संस्थेच्या सदस्यांनी गावांमधील बाधित नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. 


अस्तित्व फाउंडेशनचे अध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे यांनी सांगितले की,  “आपल्या छोट्याशा योगदानातून अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी हातभार लावला, हीच खरी सामाजिक एकजूट आहे.”  


या मदत उपक्रमाचे नियोजन आणि वाटपाचे समन्वय पाथरी येथील श्याम धर्मे, प्रल्हादराव गिराम, आणि विठोबा आगरकर यांनी केले.  

तसेच अस्तित्व फाउंडेशनच्या वतीने राधाकिसन मगार, अरुण कदम, खुशाल काळे, प्रशांत देशमुख, सुनील महाजन, आणि ऋतिक जगताप यांनी गावांमध्ये जाऊन श्रमार्पण (श्रमदान) करून मदतकार्य यशस्वी केले.  

अस्तित्व फाउंडेशनतर्फे सर्व दाते, स्वयंसेवक, स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले असून संस्था पुढेही समाजोपयोगी कार्य लोकसहभागातून राबविण्याचा संकल्प व्यक्त करते.

थोडे नवीन जरा जुने