चुरशीच्या लढती होण्याचे संकेत ; इच्छुकांची भाऊगर्दी वाढली
महिलांसाठी ११ तर १० पुरुषांसाठी १० प्रभाग राखीव
नगराध्यक्ष पदास राहुल चिताळकर पाटील ; लोकनियुक्त नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील चर्चेत
आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी नगरपरिषदेत अनेक वर्षांपासून प्रशासकीय राजवट असल्याने नाराज झालेल्या नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांनंतर हक्काची माणसे मिळणार आहेत. यासाठी गेल्या चार वर्षापासून रखडलेल्या निवडणूक प्रक्रियेस अखेर न्यायालयाचे हस्तक्षेपाने मुहूर्त मिळणार आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून राज्य निवडणूक आयोगाचे मार्गदर्शक सूचना प्रमाणे पुणे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात आळंदी नगरपरिषदेसह काही नगरपरिषद निवडणूक पूर्व कामकाजासाठी प्रभाग रचने नंतर नगराध्यक्ष पदांची आरक्षणे जाहीर करीत एक पाऊल प्रभागाचे आरक्षण जाहीर करीत टाकले आहे.
लांबलेल्या निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ ; प्रभाग आरक्षण सोडत जाहीर
आळंदी नगरपरिषद मध्ये नगराध्यक्ष पदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी निघाल्याने यासाठी तसेच आता प्रभाग आरक्षणे सोबतीने जाहीर केले आहेत. या सोडतीत अनेकांचे प्रभाग आरक्षण मनासारखे न निघाल्याने लगतच्या प्रभागातून निवडणूक लढविण्याचे तयारीत आहेत. अनेक वर्ष निवडणुका शासनाच्या धोरणामुळे रखडल्या होत्या. येत्या डिसेंबर, जानेवारी मध्ये निवडणुका होणार असल्याची शक्यता तसेच न्यायालयाने ही राज्य शासनास निवडणुका घेण्याचे निर्देश देऊन जानेवारी अखेर प्रस्तावित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे सूचना देश दिले आहेत. या मुळे राज्य शासनाने राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने कार्यक्रम जाहीर केला. त्या प्रमाणे प्रशासकीय कामकाज आळंदी नगरपरिषद सह सुरू करण्यात आले आहे.
आळंदी नगरपरिषद प्रभाग निहाय १ ते १० प्रभागांसाठी प्रभाग आरक्षण चिठ्ठ्या टाकून काढण्यात आले.
या मध्ये आगामी आळंदी नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासना कडून प्रभाग निहाय आरक्षणाची घोषणा करण्यात आली. या आरक्षण सोडती नंतर नगरपरिषद राजकीय गणिते विस्कटली आहेत. आळंदीतील प्रभाग निहाय आरक्षणात महिलांसाठी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी तसेच सर्वसधारण महिला, पुरुष यांचेसाठीची प्रभाग आरक्षणे पीठासीन अधिकारी तथा प्रांत शिरूर विठ्ठल जोशी, मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी जाहीर केली.
प्रभाग राखीव जाहीर झाल्याने अनेकांना प्रभाग राहिले नसल्याने लगतच्या प्रभागातून निवडणुका लढविण्याचे तयारीला लागले आहेत. प्रभाग १ ते ९ मध्ये प्रत्येकी दोन जागा तसेच प्रभाग क्रमांक १० मध्ये तीन जागांसाठी सोडती काढण्यात आल्या. या वेळी इच्छुकांची तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी गर्दी केली होती. महिलांची संख्या वाढल्याने आळंदीत महिला राजचा मार्ग मोकळा झाला असून नगराध्यक्ष पद खुले असल्याने अनेकांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे.
आळंदी प्रभाग आरक्षण सूचना हरकतीसाठी १४ ऑक्टोबर पर्यंत मुदत
राज्य शासनाच्या सूचना आदेशा प्रमाणे प्रभागातील लोक संख्या आणि उतरत्या क्रमाने आरक्षणे राखीव ठेवण्यात आली आहेत. मात्र गावठाण फोडल्याने अनुसूचित जातीचे समाजावर अन्याय झाला असून अनेक वर्षा पासून पारंपरिक राखीव प्रभाग बदलला गेला आहे. या मुळे येथील रंधवे पाटील, थोरात, पाटोळे, रणदिवे, भोसले, बनसोडे यांना निवडणुकीत राखीव प्रभाग राखीला नाही. प्रभाग रचनेसह आता आरक्षण जाहीर झाल्याने यावर देखील हरकती घेण्यात येणार असल्याचे संदीप रंधवे यांनी सांगितले. या वेळी मुख्याधिकारी माधव खांडेकर म्हणाले, आळंदीतील प्रभाग लोकसंख्या, घनता, जात निहाय प्रभागातील लोकसंख्या, भौगोलिक परिस्थितीचा विचार करून ही प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. या आरक्षणा विरोधात हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी १४ ऑक्टोबर दुपारी ३ वाजे पर्यंत मुदत देण्यात आली आहे. मुदतीत आलेल्या हरकत अर्जावर सुनावणी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आळंदीतील प्रभाग आरक्षण जाहीर ; अनुसूचित जाती संवर्ग गावठाण फोडल्याने नाराजी
आळंदी प्रभाग निहाय आरक्षण मध्ये प्रभाग १ अ ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, ( महिला ) ब ) सर्वसाधारण, प्रभाग २ अ) अनुसुचित जाती ( महिला ), ब ) सर्वसाधारण, प्रभाग ३ अ ) सर्व साधारण ( महिला ), ब ) सर्वसाधारण, प्रभाग ४ अ ) नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ), ब ) सर्वसाधारण, प्रभाग ५ अ ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब ) सर्वसाधारण ( महिला ), प्रभाग ६ अ ) सर्वसाधारण ( महिला ), ब ) सर्वसाधारण, प्रभाग ७ अ ) सर्व साधारण ( महिला ), ब ) सर्वसाधारण, प्रभाग ८ अ ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब ) सर्वसाधारण ( महिला ), प्रभाग ९ अ ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब ) सर्वसाधारण ( महिला ), प्रभाग १० अ ) अनुसुचित जाती, ब ) नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ) क ) सर्व साधारण ( महिला ) या प्रमाणे प्रभाग आरक्षणे जाहीर झाली आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी आळंदीत इच्छुकांची भाऊगर्दी वाढली
आळंदीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडे इच्छूकांची भाऊगर्दी वाढली आहे. याशिवाय आळंदी जनहित विकास आघाडी ही नगराध्यक्ष पदासह सर्व प्रभाग संवर्ग निहाय निवडणुकीचे रिंगणात उतरणार आहे. या शिवाय नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेना दोन्ही गट आणि अपक्ष असे मोठ्या प्रमाणात इच्छुक असून पक्षीय पातळीवर एकमत न झाल्यास बहुरंगी सामना आळंदीत नगराध्यक्ष पदासह नगरसेवा पदासाठी रंगणार आहे. अनेकांनी उघड भूमिका अजून जाहीर केली नसून माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील, माऊलींचे मानकरी माजी नगराध्यक्ष राहुलशेठ चिताळकर पाटील, प्रशांत कुऱ्हाडे, पांडुरंग वहिले, अजय तापकीर, सुरेश दौडकर, रोहिदास तापकीर, किरण येळवंडे, संजय घुंडरे पाटील आदींनी इच्छुक म्हंणून दावेदारी केली आहे. माजी नगराध्यक्ष विलासशेठ कुऱ्हाडे पाटील, माजी उपाध्यक्ष वासुदेव घुंडरे पाटील यांनी आपली भूमिका अद्याप जाहीर केली नाही. यामुळे येत्या काळात कोण कोणावर मात करीत आळंदीचे विकास कामाच्या धुऱ्या पेलणार हे निवडणुकीचे निकाला नंतर स्पष्ठ होणार आहे. आळंदीत मात्र सर्वाना बरोबर घेऊन जाऊन आळंदीचा विकास साधणारे व्यक्तिमत्व निवडण्याची संधी मतदारांना येत्या निवडणुकीने मिळणार आहे.