पिंपरी चिंचवड - सामाजिक कार्य क्षेत्रातील उल्लेखनीय आणि प्रेरणादायी योगदानाबद्दल आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन, पुणे तर्फे सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर अण्णासाहेब थोरात यांना प्रतिष्ठित “महाराष्ट्र गौरव २०२५” राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
किशोर थोरात यांनी शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संरक्षण, तसेच दुष्काळग्रस्त आणि गरीब विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सातत्याने सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या कार्यामुळे समाजात जागरूकता आणि सकारात्मक बदल घडविण्याचे उल्लेखनीय योगदान त्यांनी दिले आहे.
या सन्मानाने सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवकांना नवीन प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजक संस्थेने व्यक्त केला आहे. पुरस्कार वितरण समारंभ १४ ऑक्टोबर रोजी पुणे येथे पार पडणार असून, विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
या गौरवाबद्दल थोरात यांनी आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार मानले असून, “हा सन्मान माझ्या नव्हे तर समाजसेवेसाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे,” अशी भावना व्यक्त केली आहे.
कोण आहेत किशोर थोरात?
सातत्याने सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमठविणारे किशोर आण्णासाहेब थोरात हे अनेक सामाजिक संस्थांबरोबर काम करत असतात.
सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे ते पुणे जिल्हा अध्यक्ष आहेत, तर मानवी हक्क जण जागृती बरोबरच पोलीस प्रशासन आणि जनता या मधील दरी दूर करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.
श्री समर्थ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष असून मुलांच्या शिक्षणावर ते काम करतात, तसे आधार शैक्षणिक संस्था पुणे चे ते सचिव असून ग्रामीण भागातील गरीब मुलांच्या शिक्षणाला हातभार लावतात.
अनंतकोटी श्री स्वामी समर्थ सेवामार्ग ट्रस्ट बरोबर ते लोकांच्या समस्या निवारण चे ते काम करतात.
मागील आठवड्यातच त्यांनी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ च्या वतीने अजून संस्थांना बरोबर घेऊन बीड जिल्ह्यातील पुरग्रस्तांच्या मुलांना शैक्षणिक किट देऊन एक हात मदतीचा उपक्रम राबविला.
निराधारांच्या बरोबर दिवाळी साजरी करणार असून आता पुढील उपक्रम तोच असेल असे त्यांनी सांगितले.
वरील पुरस्कार मिळाल्याने वरील सर्व संस्थांच्या पदाधिकारी व सदस्यांकरून किशोर थोरात यांचे भरभरून कौतुक केले जात आहे तर सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशजी कुंभारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजसजी परमार आणि पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांनी अभिनंदन केले.
अनंतकोटी श्री स्वामी संमर्थ सेवामार्ग ट्रस्ट चे सर्वेसर्वा संजय तळोले व अध्यक्ष दिगंबर थोरात यांनीही किशोर थोरात यांचे अभिनंदन व कौतुक केले.
किशोर थोरात यांना सामाजिक कार्यासाठी या अगोदरही ३० पेक्षा जास्त पुरस्कार हे विविध सामाजिक संस्थांच्या मार्फत मिळलेले आहेत तर परिसरातून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.