![]() |
पन्नास हजारावर भविकांची दर्शनास गर्दी ; इंद्रायणी घाटावर आरती उत्साहात
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात पाशांकुश एकादशी दिनी श्रींचे गाभाऱ्यात पुष्प सजावट करण्यात आली होती. भाविकांनी दर्शनास गर्दी करून श्रींचे दर्शन घेतल्याचे देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.
आळंदी मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रींचे वैभवी गाभाऱ्यात विविध रंगी आकर्षक फुलांचा वापर करीत पुष्प सजावट करण्यात आली होती. मंदिरात एकादशी निमित्त महाप्रसाद आळंदी देवस्थान तर्फे वाटप करण्यात आले. आळंदीतील इंद्रायणी नदी घाटावर दुतर्फ़ा भाविकांनी गर्दी करून स्थान माहात्म्य जोपासत तीर्थ प्राशन करीत स्थान माहात्म्य जोपाले. वारकरी भाविकांनी हरिनाम गजरात नगरप्रदक्षिणा करीत एकादशी साजरी केली. परंपरांचे पालन करीत आळंदी मंदिरात धार्मिक कार्यक्रम प्रसाद, महानैवेद्य झाला. विणा मंडपात प्रवचन सेवा मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीतून झाली. कीर्तनास भाविकांनी गर्दी केली.
एकादशी दिनी इंद्रायणी नदी घाटाची स्वच्छता ; इंद्रायणीची आरती उत्साहात
तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, महिला बचत गट सदस्य, आळंदी जनहित फाउंडेशन, पदाधिकारी, महिला मंडळ तसेच आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर घाट स्वच्छता करीत इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली.
यावेळी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम, अनिता शिंदे, नीलम कुरधोंडकर, शोभा कुलकर्णी, कौसल्या देवरे, सरस्वती भागवत, शारदा गिरी महाराज, काशीबाई अडकिळे, सुनीता हेळी, जयश्री भागवत, अंजली काकडे, उषा ककडे, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष संयोजक अर्जुन मेदनकर, अमर गायकवाड, आळंदी उपशहर प्रमुख माऊली घुंडरे, आदींसह महिला भाविक, आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते. इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्याचे आवाहन करीत इंद्रायणी नदी घाटावर आरती उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम यांनी केले. इंद्रायणी नदीत निर्माल्यादी वस्तू, कपडे कचरा, तुटलेले फोटो, काचा न टाकण्याचे आवाहन करण्यात आले. तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुपचे वतीने अनिता झुजम, संयोजक अर्जुन मेदनकर यांनी उपक्रमाचे आयोजन केले. स्वच्छ आळंदी, सुंदर आळंदी हरित आळंदीसाठी जनजागृती करीत इंद्रायणी नदी घाटावर स्वच्छता करीत स्वच्छतेकडे लक्ष वेधण्यात आले. यात महिला भाविकांनी विशेष परिश्रम घेतले.